Nashik Crime : उच्चभ्रू परिसरात क्लबच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत. त्यावर शिक्कामोर्तब झाला असून, गंगापूर पोलिसांनी डिसूझा कॉलनीतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील मॉलिक्यूल्स हॉटेलवर छापा टाकला असता, हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी हॉटेल मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Raid on Hookah Parlor in Molecules Hotel Nashik Crime)
इब्राहिम वसीम अन्सारी (२३, रा. खोडेनगर), वैभव धनराज अहिरराव (२४, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. गंगापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार मच्छिंद्रनाथ वाकचौरे यांच्या फिर्यादीनुसार, डिसूझा कॉलनीतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मॉलिक्युल्स हे हॉटेल आहे.
या हॉटेलमध्ये सतत पार्ट्या सुरू असतात. विशेषतः पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा वापर होत असल्याचा संशय पोलिसांना होता. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला होता. परंतु कारवाई करताना काही अडचणी आल्याने हाती ठोस काही न लागल्याने पोलिसांचा प्रयत्न फसला होता.
परंतु, या वेळी गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निबांळकर यांनी या हॉटेलवर धडक कारवाई करीत गुन्हा दाखल केल्याने परिसरात हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेल चालकांचे धाबे मात्र दणाणले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लगाम कोण घालणार?
गेल्या वर्षांपासून गंगापूर रोड, कॉलेज रोड, कॅनडा कॉर्नर या परिसरात अनेक हॉटेल्स सुरू झालेले आहेत. या हॉटेल्समध्ये सातत्याने तरुणाई दिसून येते. यातील काही हॉटेल्समध्ये क्लब पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
वीकएंडला रात्री- बेरात्रीपर्यंत रंगणाऱ्या या पार्ट्यांमुळे आसपासच्या रहिवाशांनाही त्रास होतो. तर रात्री उशिरा मद्यपी तरुणांमध्ये रस्त्यांवर धिंगाणा घातला जातो. असे प्रकार अलीकडे वारंवार घडत असून, क्लब पार्ट्यांच्या आड सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना लगाम कोण घालणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
भरधाव वेगात वाहने चालवून धुडगूस घालणारे उच्चभ्रूंची मुले दांडगाई करतात. त्यातून अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक हॉटेल्सची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.