Completed main girder casting work. In the second photo, workers working on the flyover. esakal
नाशिक

Nashik News : खेरवाडी येथील रेल्वे उड्डाणपूल घेतोय आकार; मुख्य गर्डर टाकण्याचे काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ओझर-चांदोरी जिल्हा मार्गावर खेरवाडी-नारायणगाव येथे सध्या मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरु आहे.

मध्य रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस दररोज दोन तास मेगाब्लॉक घेत उड्डाणपुलावरील रेल्वे मार्गाच्या हद्दीतील मुख्य गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले असून उड्डाणपुलाची उभारणीमधील हा मुख्य टप्पा पूर्ण झाला आहे. (Railway flyover at Kherwadi will complete soon Casting of main girder completed Nashik News)

ओझर-खेरवाडी-चांदोरी- सायखेडा या प्रमुख जिल्हा मार्गावर खेरवाडी (नारायणगाव) येथे मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक असल्याने तासनतास वाहतुकीचा खोळंबा होत होता, त्यामुळे रेल्वेने याठिकाणी उड्डाणपूल मंजूर केला.

दोन वर्षांपूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरु झाले होते, मात्र ते काम संथगतीने सुरु होते, गेल्या सहा ते सात महिन्यापासून उड्डाणपुलाच्या बांधकामे वेग घेतला असून खेरवाडी येथील मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या मुख्य मार्गावर गर्डर आणि पिलर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे फाटकच्या भागात एकूण पाच गर्डर टाकण्यात आले आहे.

गोदाकाठच्या शेतकऱ्यांना होणार फायदा

ओझर-चांदोरी-सायखेडा हा रस्ता पुढे सिन्नर-शिर्डीला जोडला जात असल्याने या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. गोदाकाठसह सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांना ओझर-पिंपळगाव बाजारपेठेत शेतमाल नेण्यासाठी हाच एकमेव जवळचा मार्ग आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

गुजरातहून पेठ सुरगाण्याचे हजारो भाविक शिर्डीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. उड्डाणपुलामुळे वाहनाधारकांच्या वेळेची बचत होणार आहे.

"खेरवाडी येथील उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला आहे, ही दिलासा देणारी बाब असली तरी काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे." -सुभाष आवारे, खेरवाडी, नारायणगाव

"उड्डाणपुलाचे काम सुरु असून अत्याधुनिक क्रेन आणि मशिनरीच्या साहाय्याने होत असलेल्या कामाचा वेग पाहता पावसाळ्यापूर्वी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या दृष्टीने फायदा होईल." -मोतीराम पवार, ग्रामस्थ, खेरवाडी

"उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून एसटी बस बंद झाली आहे. शाळेत जायला अडचणी येत आहे. उड्डाणपूल लवकर सुरळीत व्हावा."- ईश्वरी आवारे, विद्यार्थिनी, नारायणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT