Rain Update News esakal
नाशिक

Nashik Rain Alert : जिल्ह्यात आज मध्यम,उद्या जोरदार पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Alert : मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाले असताना गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाने काही भागात उघडीप दिली आहे. आज दुपारनंतर शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार झाले होते. (rain alert Chance of moderate rain in district today heavy rain tomorrow nashik news)

मात्र पाऊस न झाल्याने उकाड्यात भर पडली होती. अशा परिस्थितीत बुधवारी (ता. ५) मध्यम, तर गुरुवारी (ता. ६) घाट भागात जोरदार आणि शुक्रवारी (ता. ७) जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यात ९ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता वर्तवत असताना केंद्रातर्फे पुढील पाच दिवस ढगाळ हवामान राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तापमान कमाल २७ ते ३२ आणि किमान २२ ते २४ अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग तासाला १६ ते २१ किलोमीटर राहण्याचा अंदाज केंद्राचा आहे.

जिल्ह्याच्या पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभागातील सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, नाशिक व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सलग तीन ते चार दिवस पेरणीयोग्य ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर कराव्यात, असा सल्ला केंद्राच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात आतापर्यंत ७०.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी अशी : मालेगाव-६६.४, बागलाण-७१.४, कळवण-१०६.८, नांदगाव-३९.२, सुरगाणा-१०८.५, नाशिक-५७.४, दिंडोरी-१०८.२, इगतपुरी-६०.२, पेठ-८७.५, निफाड-८२.५, सिन्नर-५२.८, येवला-७७.७, चांदवड-४९.१, त्र्यंबकेश्‍वर-८०, देवळा-६७.

मंडलातील चांगला पाऊस

मंडलनिहाय यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेला चांगला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : कनाशी-२५२.१, दळवट-२५२.७, अभोणा-२००.७, उंबरठाण-४२५.१, बाऱ्हे-३६३.१, बोरगाव-३४१.४, मनखेड-३७६.६, सुरगाणा-४७२.५,

त्र्यंबकेश्‍वर-३४२.८, वेळुंजे-३६६.५, हरसूल-३२५.५, ननाशी-४१९.५, इगतपुरी-६२९.६, घोटी-४९४.९, वाडीवऱ्हे-२५८, नांदगाव सदो-२१०.९, टाकेद-२३८.२, धारगाव-४८६.७, पेठ-४६०.४, जोगमोडी-३४५.२, कोहोर-२१७.३.

जलसाठा २ टक्क्यांनी अधिक

जिल्ह्यातील मोठ्या ७ आणि मध्यम १७ अशा एकुण २४ धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी अधिक म्हणजेच २६ टक्के जलसाठा झाला आहे. पावसाला सुरवात झाली असताना धरणांमध्ये २१ टक्के जलसाठा होता. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गेल्यावर्षीपेक्षा ५ टक्के अधिक म्हणजेच, ३१ टक्के जलसाठा झाला आहे.

मोठ्या क्षमतेच्या धरणांपैकी करंजवणमध्ये १५, दारणामध्ये ३४, मुकणेत ४६, कडवामध्ये २०, चणकापूरमध्ये ३७ टक्के जलसाठा झाला आहे. मात्र मालेगावसह खानदेशसाठी महत्वाच्या असलेल्या गिरणामध्ये अद्याप गेल्यावर्षीच्या तुलनेत ११ टक्के कमी म्हणजेच, २२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT