Fog in igatpuri esakal
नाशिक

इगतपुरी परिसरात पावसासह धुक्याने नागरिक आनंदात

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : गेल्या आठवड्यात अधूनमधून बरसलेल्या हलक्या आणि मध्यम पावसाच्या (Rain) सरींनंतर शुक्रवारी (ता. १) इगतपुरीकरांनी ऋतूला कूस बदलताना पाहिले. शुक्रवारची सुरवात पहाटेच्या दाट धुक्याने (Fog) झाली, तर नाशिक-मुंबई महामार्गावरही धुक्याची चादर पसरल्याने वाहने संथ गतीने धावत होती. (rain and fog in Igatpuri area Nashik News)

शहरातील बहुतेक भागांमध्ये शुक्रवारी धुक्याची दाट चादर पसरली होती. शहरातील उंच उंच इमारतींचे वरीलमजले त्या धुक्यांवरून डोकावत होते. धुके पावसाच्या आगमनाची चाहूल देतात. त्यामुळे लवकरच पावसाचे जोरदार आगमन होण्याच्या शक्यतेने नागरिक आनंदात आहे.

अनाहूतपणे आलेल्या या धुक्यामुळे ‘मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सूर्योदय होताच धुक्याची ही चादर अधिक ठळकपणे दिसू लागली. धुके एवढे दाट होते, की काही काळ सूर्यनारायणही त्याआड झाकले गेले. शहरातील वाहतुकीवर या धुक्याचा फारसा परिणाम झाला नाही. परंतु उंचावर पाहिले असता शहरातील उंच इमारती आणि आसपासचा परिसर मात्र त्यात हरवून गेला होता. वातावरणातही नेहमीपेक्षा आल्हाददायक गारवा जाणवत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT