Agriculture officer inspecting Asha Loknar's yellowed soybean crop. esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: निफाड तालुक्यात सोयाबीनला फटका! 20 टक्के पीक पिवळे पडून उत्पादन घटण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : दोन वर्षांपासून सोयाबीनला सोन्याचा भाव मिळत असल्याने यंदा निफाड तालुक्यात सरासरीपेक्षा १२५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. मात्र, पावसाने ओढ दिल्याने त्याचा फटका पिकाला बसला.

शिवाय तणनाशक फवारणी शेतकऱ्यांच्या अंगलट आली. निफाड तालुक्यातील सुमारे २० टक्के म्हणजे पाच हजार एकरावरील सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडली आहेत.

याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या पथकाने थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. (Rain Crisis Soybeans hit in Niphad Taluka Fear of 20 percent yellowing of crop and reduction in production nashik)

निफाड तालुक्यात २५ हजार एकरावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. टप्प्याटप्प्याने झालेल्या पेरणीतून सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले होते. ऐन भरात असताना पावसाने मोठी ओढ दिली. त्यामुळे उशिराने पेरणी झालेल्या पिकाला पाऊस व तणनाशक फवारणीचा फटका बसला.

सुमारे पाच हजार एकरावरील सोयाबीनचे पीक पिवळसर झाले आहे. पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, साकोरे मिग परिसरातील पिकांची पाहणी पथकाने केली. त्यात कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश पाटील, प्रा. भालचंद्र मस्के यांनी अन्नद्रव्ये व विद्राव्य खतांची शिफारस केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, पीक पिवळे पडल्याने शेतकऱ्यांना उत्पादन घटण्याची भीती सतावत आहे. शेतकरी प्रशांत मोरे, आशा लोकणार, बबेभाऊ बोरस्ते, ज्ञानदेव बोरस्ते यांच्या बांधावर जाऊन पथकाने पाहणी केली. कृषी अधिकारी गणपत शिंदे, प्रमोद पाटीलही उपस्थित होते.

"मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली. मात्र, पीक मोठ्या प्रमाणात पिवळसर झाले आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे."\

-आशा लोकणार, महिला शेतकरी, कोकणगाव

"उशिराने पेरणी झालेल्या सोयाबीनची पिके पावसाने ओढ दिल्याने काही प्रमाणात पिवळी पडली आहेत. तज्ज्ञांनी संबंधित शेतकऱ्यांना खतांच्या मात्राची शिफारस करून उपाययोजना करण्यास सांगितले आहे." -सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT