The river Godavari has flooded and the temple and the area of ​​Godavari river are submerged in flood water (Photo: Keshav Mate) esakal
नाशिक

Nashik Rain News : वरुणकृपा... आजही होणार! गोदावरी अन गिरणासह आठ नद्यांना पूर; आज ‘रेड अलर्ट'

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain News : जुलैअखेर येऊन गायब झालेल्या वरुणराजाने गुरुवारी (ता. ७) रात्रीपासून कृपादृष्टी केली असून, शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून मुसळधार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या जिवात जीव आला आहे.

खरिपातील काही पिके यामुळे वाचली असून, धरणातील साठ्यांतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला पहिला पूर आला असून, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोचले आहे.

याशिवाय गिरणा, कादवा, कोलवण, आरम, मोसम, उनंदा, वालदेवी नदीला पूर आला आहे. कोलवणच्या दोन्ही काठच्या रहिवाशांना खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. (rain Flooding of eight rivers including Godavari and Darna nashik news)

जुने घर कोसळल्याने नळवाडपाडा (ता. दिंडोरी) येथे आजोबा-नातवाचा, तर खामखेडा (ता. देवळा) येथे खड्ड्यातील पाण्यात बुडून मेंढपाळ्याच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे शनिवारी (ता. ९) ‘रेड' इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवारी (ता. १०), सोमवारी (ता. ११) व मंगळवारी (ता. १२) काही ठिकाणी हलक्या-मध्यम पावसाची शक्यता आहे.

त्याचबरोबर शनिवारी पहाटे पाच ते रात्री आठ या वेळेत आणि रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत ओझर, आडगाव, म्हसरूळ, सिन्नर, अंबड, रामाचे पिंपळस या उपकेंद्रातून पुरवठा होणाऱ्या वाहिन्यांचा वीजपुरवठा अंशतः खंडित होऊ शकेल, असे ‘महापारेषण’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय पाऊस

तालुकानिहाय शुक्रवारी सकाळपर्यंत २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : मालेगाव- १.१, बागलाण- १४.२, कळवण-६५.१, नांदगाव- ३.७, सुरगाणा- ६५.३, नाशिक- १४.४, दिंडोरी- २९.४, इगतपुरी- ५३.७, पेठ- ४१.५, निफाड- १४.९, सिन्नर- ७.४, येवला- ८.४, चांदवड- ३७.५, त्र्यंबकेश्‍वर- ८९.६, देवळा- २७.९. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ टक्के पाऊस झाला आहे. टंचाईने ग्रासले होते, अशा भागाला या पावसाने दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विशेषतः बागलाण, देवळा, कळवण, दिंडोरी तालुक्यांत विहिरीच्या पाण्यावर जगविण्यात येत असलेल्या मका, सोयाबीनला जीवदान मिळाले आहे. आदिवासी भागातील भात, नागली, वरईला मदत झाली. त्याचबरोबर ऑक्टोबरच्या रेंगाळलेल्या द्राक्षबागांच्या छाटणीला वेग येण्यास मदत होईल. पाऊस सुरू राहिल्यास रब्बी हंगामात पिके घेण्यासह कांदा, भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.

मृतांची नावे

० नळवाडापाडा (ता. दिंडोरी) येथे जुने घर कोसळल्याने आजोबा गुलाब खरे, त्यांचा नातू निशांत (वय ३) हे दोघे ठार झाले. निशांतच्या आजी विठाबाई यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले

० खामखेडा (ता. देवळा) येथे खड्ड्यातील पाण्यात बुडून मेंढपाळाचा मुलगा केदा नामदास (वय ६) याचा मृत्यू झाला

धरणातून सुरू असलेला विसर्ग

(आकडे क्यूसेकमध्ये)

गंगापूर : ४ हजार ७४ (रात्री ८ नंतर ६ हजार २८२)

० कडवा : ५ हजार ४७४

० दारणा : १ हजार ४००

० नांदूरमध्यमेश्‍वर : ४ हजार ८४२

० कादवा नदीपात्रात पालखेडमधून : ६ हजार ७३२

० आळंदी ‘ओव्हर फ्लो' झाल्याने : २१०

० गिरणा नदीपात्रात : चणकापूरमधून- ३३ हजार आणि पुनंदमधून- १६ हजार ३८६

० आरम नदीपात्रात केळझरमधून : ५ हजार

० मोसम नदीपात्रात हरणबारीमधून : ५ हजार ५००

ठळक नोंदी

० वालदेवी नदीला पूर आल्याने दाढेगाव-पाथर्डी पूल, तर गिरणावरील सावकी-विठेवाडी पूल पाण्याखाली गेला

० दिंडोरीत संततधार आणि मुसळधार पाऊस. उनंदा नदीला पूर आल्याने वणी-फोफशी दळणवळण ठप्प झाले

० इगतपुरीतील मुकणे नदी खळखळून वाहू लागली आणि बेलगाव कुऱ्हे भागातील नाल्याला पूर आला

० नाशिकमध्ये आज सायंकाळपर्यंतच्या गेल्या ३३ तासांत ७७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली

० नाशिकमधील पाथर्डी भागातील घरांमध्ये पाणी शिरले. ड्रेनेज तुंबल्याने मोकळे भूखंड पाण्याने वेढले

० नाशिकमध्ये आठ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या आणि शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते

० नाशिकमध्ये नंदिनी नदी वाहिली असून, शहराच्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता

० सिन्नरमध्ये जोरदार पाऊस, पश्‍चिम भागात पावसाचा जोर आणि पूर्व भागात रिमझिम पाऊस

० अभोणा परिसरात शेतात पावसाच्या पाण्याचे साचले तळे. आठवडा बाजार विस्कळित झाला असून, नद्या-नाल्यांना पूर आला

० पेठ तालुक्यात शेताचे बांध फुटून नुकसान झाले. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ पिकांना संजीवनी मिळाली. टोमॅटो, वांग्याची रोपे जमीनदोस्त झाली

महसूल मंडलनिहाय पाऊस

(आकडे गेल्या २४ तासांतील मिलिमीटरमध्ये)

वीरगाव- १८, जायखेडा- १४.३, डांगसौंदाणे- ४०.८, मुल्हेर- २३.३, कळवण- ३३.८, नवी बेज- ७५, मोकभणगी- ७३, कनाशी-५४, दळवट- ८६.५, अभोणा- ६८.३, उंबरठाण- ७८.५, बाऱ्हे- ४१.५, सुरगाणा- ७८.५, सातपूर- ३३.५, उमराळे- ३०.३, ननाशी-५३.३, कोशिंबे- ४०.५, कसबे वणी- ४५, रामशेज- २४.८, इगतपुरी- ७८.३, घोटी- ३१.८, वाडीवऱ्हे- ५९, टाकेद- ४३.५, नांदगाव सदो- २२.५, धारगाव- ८६.८, पेठ- ४६, जोगमोडी- ४६, करंजाळी- ४३.८, कोहोर- ३०.३, पिंपळगाव- २१.५, निफाड- १३.८, रानवड- २८, लासलगाव- १७.८, देवगाव- १५.८, विंचूर- २२.५, पांढुर्ली- १४.३, चांदवड- ४९.५, रायपूर- ३६.८, दिघवद- ४०, दुगाव- ३८.३, वडनेर- २१.५, वडाळीभोई- ३८.८, त्र्यंबकेश्‍वर- ७४.५, वेळुंजे- १०४.८, हरसूल- ६५.५, ठाणापाडा- ८५.५, दहाडेवाडी- ११७.५, देवळा- ४३.८, लोहोणेर- ३७.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT