लखमापूर (जि. नाशिक): दिंडोरी तालुक्यात यंदा पावसाने जोरदार सुरवात करीत सरासरीच्या वर बाजी मारल्याने धरणांना पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे सर्व धरणांतील साठा ९० टक्क्यांच्या वर पोहचला आहे.(Rains exceed average in Dindori All dams above 90 percent Nashik latest news)
यंदा दिंडोरीत पावसाचे दीड महिना उशिराने आगमन झाले. परंतु, पावसाने जोरदार बँटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. पहिल्या पावसातच धरणे ओव्हरफ्लो झाल्याची नोंद इतिहासात प्रथमच नोंदवली गेली.
त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणावर नद्यांमध्ये विसर्ग केल्याने बहुतेक ठिकाणी महापुराची स्थिती निर्माण होऊन अनेक ठिकाणांच्या गावांचा संपर्क तुटला होता. अनेक गावांच्या नदीवरील पूल पाण्याखाली गेले. काही ठिकाणचे पूल वाहून गेले. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अति पाण्यामुळे पिके पिवळी पडून दुबार पेरणीचे संकट शेतकरी वर्गावर आले होते.
आतापर्यंत दिंडोरी तालुक्यातील पावसांची सरासरी १९२.४ टक्क्यांवर गेल्याने विक्रमी आकडेवारीची नोंद झाली. आजही नद्या- नाले भरभरून वाहत आहे. परंतु, यंदा मात्र तालुक्यातील बळीराजाच्या खरीप हंगामावर अतिपावसाचे संकट कोसळल्याने खरीपातील उत्पादनाची टक्केवारी मात्र घटण्याचे संकेत आहे.
फक्त भात पिक सोडले तर बाकीच्या पिकांची वाट लागली आहे. त्यामुळे तालुक्यात ओल्या दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे. यामध्ये सोयाबीन, मका, भुईमूग व विविध भाजीपाला अति पावसाने सडल्यामुळे अस्मानी संकट कोसळले.
दिंडोरी तालुक्यातील पाणीसाठा
वाघाड : १०० टक्के
पालखेड : ८९ टक्के
करजंवण : ९५.४० टक्के
ओझरखेड : १०० टक्के
पुणेगाव : ९६.२३ टक्के
तिसगाव : १०० टक्के
"यंदा पावसाने रौद्र रूप दाखविल्याने अनेक ठिकाणी पिकांची वाट लागली. त्यामुळे यंदाच्या खरीपात शेतकरी वर्गाला संकटाचा सामना करावा लागणार आहे. शासनाने यंदाच्या खरिप हंगामात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई, कर्जमाफी, पिकविमा योजना देऊन आर्थिक आधार द्यावा." - रघुनाथ पाटील, प्रगतिशील शेतकरी, वलखेड (ता. दिंडोरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.