new currant has entered the market committee and traders have participated in the auction at Pimpalgaon Baswant  esakal
नाशिक

Nashik News : नव्या बेदाण्याची पिंपळगाव बाजार समितीत आवक; किलोला मिळाला 138 रुपये भाव!

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : यंदाच्या हंगामातील नव्या बेदाण्याचे पिंपळगाव बाजार समितीत आकर्षक दराने स्वागत झाले आहे. १३८ रुपये प्रतिकिलो असा दर नव्या बेदाण्याला मिळाल्याने यंदा बेदाणा उत्पादकांसाठी सकारात्मक संकेत मिळाले आहे. सोमवारी (ता.२६) पिंपळगाव बाजार समितीत झालेल्या बेदाणा लिलावात नव्या हंगामातील एक टन बेदाण्याची आवक झाली. (raisins at Pimpalgaon market committee Kilo got 138 rupees price Nashik News)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सटाणा परिसरातील द्राक्ष हंगाम गेली दोन महिन्यापासून सुरू आहे. येथे तयार झालेला बेदाणा पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी येऊ लागला आहे. देशांतर्गत तमिळनाडू येथे होणार पोंगल सण उत्सवामुळे बेदाण्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर आंध्रप्रदेश, केरळ मध्येही बेदाण्याला उठाव वाढला आहे. परदेशात सौदी अरेबिया, कोलंबो, व्हिएतनाम, युरोप या देशात निर्यात सुरू आहे. पिंपळगावच्या पिवळ्या बेदाण्याचे दर सरासरी १२० ते १४० रुपयांपर्यंत मिळत आहे.

नव्या बेदाण्याची आवक होऊन व्यापारी चंद्रकांत राका यांनी तो १३८ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला. यावेळी बेदाणा व्यापारी शीतलकुमार भंडारी, स्नेहल कुमार शाह, शांतिलाल चोरडीया, मोतीलाल चोरडीया, रघुनाथ शिनकर, राजेंद्र कुंभार, प्रवीण कुलथे, महेंद्र ओसवाल, योगेश ठक्कर, प्रमोद राठी, करसदास ठक्कर, रवींद्र घुमरे, इक्बाल कुरेशी, सुनील दिक्षीत, आतिष कोचर, आकाश कोचर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT