Mns chief raj thackeray Twitter
नाशिक

राज्यातील किल्ल्यांची हेळसांड खपवून घेणार नाही : राज ठाकरे

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी अवैधपणे उत्खनन सुरु आहे. परिणामी मुसळधार पावसाने महापूर आला व शेतीचे नुकसान झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अश्या दुष्कृत्यांना तीव्र विरोध आहे. राज्यातील ऐतिहासिक गड, कोट, किल्ल्यांची होणारी हेळसांड कदापिही खपवून घेतली जाणार नाही. या ज्वलंत प्रश्नासंदर्भात शासन, प्रशासनाने त्वरित जागे व्हावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल. असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. (Raj Thackeray said that the neglect of historical forts in the state will never be tolerated)

सतर्क राहून लढा देण्याचे आवाहन

गुरुपौर्णिमेच्या (ता.२३) औचित्याने मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष रोहन देशपांडे व अनेक सहकारी नाशिकहून मुंबईत कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा विविध विषयांसह ब्रह्मगिरीच्या अवैध उत्खननाबाबत चर्चा झाली. रोहन देशपांडे यांनी माहिती दिली. सह्याद्री पर्वतरांगेतील ब्रह्मगिरीसह संतोषा, भांगडी नाशिक परिसरातील अन्य डोंगरांवर गौण खनिज संपत्तीसाठी अवैधपणे सर्रास उत्खनन सुरु आहे. त्याशिवाय बेसुमार जंगलतोड व अवैध वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडतात. परिणामी पर्यावरणाचा समतोल ढळला असून जैवविविधता संपुष्टात येत आहे. एकूणच माणसांसहित जीवसृष्टीचे भविष्य धोक्यात आले आहे. माफिया टोळ्यांकडून होणाऱ्या उत्खनाने परिसरातील आदिवासी वस्तीवर संकट कोसळले आहे. दोनच दिवसांच्या मुसळधार पावसाने पायथ्याशी असलेल्या शेतीचे अभूतपूर्व नुकसान झाले. त्याला कारणीभूत केवळ अवैध उत्खनन असल्याचे रोहन देशपांडे यांनी लक्षात आणून दिले. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी असे गैरप्रकार कसे चालतात तेच मी बघतो असे सांगत पर्यावरण प्रेमींनी सतर्क राहून लढा देण्याचे आवाहन केले.

राज्यातील गड टोकदार तर नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले सपाट असल्याचे राज ठाकरेंनी नमूद केले. यावेळी मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, सचिव वल्लभ चितळे आणि कौस्तुभ लिमये तसेच जनहित कक्ष अध्यक्ष ऍड. किशोर शिंदे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढे ब्रह्मगिरीच काय, कोणतेही उत्खनन होणार नाही याची काळजी मनसे घेईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

(Raj Thackeray said that the neglect of historical forts in the state will never be tolerated)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT