Raju Shetti esakal
नाशिक

Raju Shetti Latest : टोमॅटोचा लालचिखल झाला, तेव्हा नाफेड होते कुठे? राजू शेट्टींचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

Tomato Market Rate : दोन महिन्यांपूर्वी शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होता, तेव्हा केंद्र सरकारने टोमॅटोची खरेदी का केली नाही? आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले तर ‘नाफेड’मार्फत खरेदी सुरू केली.

दर नियंत्रणात ठेवण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? टोमॅटोचा लाल चिखल होत असताना सरकार झोपले होते का... असा प्रश्न उपस्थित करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. (Raju Shetti question to central government about tomato NAFED purchase nashik)

नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता.२०) पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, ज्येष्ठ नेते साहेबराव मोरे, कुबेर जाधव उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, की टोमॅटो महाग झाला म्हणून कोणी मरत नाही.

त्यास पर्यायी भाजीपाला ग्राहकांनी खरेदी करावा. ज्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ५० पैसे, एक रुपया प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला, त्याचा ग्राहकांनीही विचार केला आहे, असेही ते म्हणाले.

नाशिक जिल्हा बॅंकेसंबंधी ते म्हणाले, की स्वतः बिऱ्हाड आंदोलन पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर केले होते. त्या वेळी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. पण, पुढे काहीच झाले नाही. राजकीय नेत्यांनी बॅंक लुटली आणि ते नामानिराळे झाले.

मात्र, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून कष्टाने शेतमाल पिकविला, त्यांना व्यापाऱ्यांनी फसविले. दर मिळाले नाहीत, आता त्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात निघत आहेत, ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा बॅंकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक हजार कोटी रुपये देण्याची मागणी सरकारकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

‘एनडीए’ किंवा ‘इंडिया’पासून समान अंतरावर

राज्यात अनेक पक्ष शेतकऱ्यांच्या बाबतीत भुलभुलय्या करीत आहेत. दहा वर्षांपूर्वी काही लोक गुजरात पॅटर्न घेऊन आले, त्यांनी शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली; तर २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, तो भुलभुलय्या ठरला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ध्येयधोरणांना आमचे प्राधान्य असल्याने आम्ही ‘एनडीए’ किंवा ‘इंडिया’पासून समान अंतरावर असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT