नाशिक : विसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेस शनिवारपासून (ता.६) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तीन नाटकांचे सादरीकरण झाल्यावर आज ‘गण्याचा देव, मनाचा देव’, ‘टेक केअर’, ‘आई तू मला हवी आहेस’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे’ ही चार ना‘के प्राथमिक फेरीत दाखल झाली.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्या (ता. ८) शेवटचा दिवस असून यात चार नाटकांचे सादरीकरण होईल. (Rajya Balnatya Spardha Preliminary round concludes tomorrow Presentation of 4 plays today in children drama competition nashik)
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे विसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी प्राथमिक फेरीतील नाटकांचे सादरीकरण झाल्यानंतर रविवारी (ता.७) सादर झालेल्या चार नाटकांत वाघेरे येथील ‘गण्याचा देव, मनाचा देव’ या नाटकाचे सादरीकरण झाले.
प्रथमेश पाटील हे या नाटकाचे लेखक असून सतीश वराडे यांचे दिग्दर्शन आहे. लहान मुलांचे विश्व, त्यांच्या आवडीनिवडी, निरागसता या नाटकातून दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक यांनी केला.
लेखक असिफ अन्सारी व कुंदा बच्छाव दिग्दर्शित ‘छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे’ या बालनाट्यातून सध्याच्या काळात धर्माच्या नावावर सुरू असलेले तंटे, वादविवाद, सामाजिक कलहाचे दर्शन घडते.
लोकहितवादी मंडळाने सादर केलेल्या ‘आई तू मला हवी आहेस’ या नाटकाचे लेखन सतीश मोहोळे यांनी तर महिमा नाईकवाडे यांनी दिग्दर्शन केले आहे.
अनु, आई, आजोबा, अमोल व मुख्याध्यापक असे मोजकेच पात्र या नाटकात असून मित्र मैत्रिणीच्या भुमिकेत नयन पिंगळे, मयंक ठाकूर, संजय पुणतांबेकर, शंतनू लोखंडे आदींनी रंग भरले आहेत. लेखक धनंजय वाबळे, दिग्दर्शक मोहिनी भगरे यांनी सादर केलेल्या ‘टेक केअर’ या नाटकाचे नूतन मराठी शाळेने सादरीकरण केले.
सोमवारी (ता.८) लेखक व दिग्दर्शिका स्वप्ना विंगळे यांचे ‘ओंजळभर चांदण्या’, जयदीप पवार लिखित व सिद्धी बोरसे दिग्दर्शित ‘बाजार’ व पूनम पाटील दिग्दर्शित ‘या काळोखाचा रंग कोणता’ व सुजित जोशी लिखित, सागर रत्नपारखी दिग्दर्शित ‘ताटी उघडा’ या चार नाटकांचे सादरीकरण होऊन प्राथमिक फेरीची सांगता होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.