प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगातून नात्याबद्दलची भावना अन् विचार प्रकट करणारी नाट्यकृती म्हणजे ‘मुंबई मॉन्सून.
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (ता. १) नम्रता कलाविष्कार बहुद्देशीय संस्थेतर्फे सादर झाले. महेंद्र तेरेदेसाई लिखित नाटकाचे राजेश टाकेकर यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha Rain of emotions and thoughts Mumbai Monsoon nashik)
माणसाच्या मनात दाटलेल्या भावना अन् आयुष्यातील प्रसंगानुरूप केले जाणारे विचार यावर पावसाच्या कोसळणाऱ्या सरींचं रूपक नाटकाच्या कथानकात आकार घेताना दिसून येते.
ज्याप्रमाणे ढगांतून पाऊस कोसळतो, पाझरतो, धो- धो पडतो त्याचप्रमाणे नात्यातील भावनांचा अन् विचारांचा पाऊस विविध पैलू घेऊन प्रेक्षकांसमोर येतो. अद्वैत आणि ओम हे पितापुत्र अन् ओमची मैत्रीण वैदेही या तीन पात्रांभोवती नाटकाची गुंफण लेखकाने केली आहे.
पत्नी समवेतच्या विसंवादामुळे अद्वैतच्या घटस्फोट होतो आणि चिमुकल्या ओमसह आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो. प्रवासात पिता पुत्राचे नाते अधिक घट्ट होते. अशातच वैदेहीचा त्यांच्या जीवनात प्रवेश होतो.
वैदेहीच्या येण्याने पिता- पुत्राच्या नात्याला वेगळी कलाटणी मिळते अन् नात्यातील भावनांचा विचार करायला लावते. मानवी नात्याची उकल करणारे कथानक प्रेक्षकांचे मनोरंजन करून जाते.
सुयोग कुलकर्णी, कुणाल घोटेकर, सृष्टी शिरवाडकर या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या. नाटकाचे नेपथ्य हरिकृष्ण डिडवाणी यांनी साकारले. विक्रम गवांदे यांनी संगीत तर विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना साकारली.
माणिक कानडे यांनी रंगभूषा, तर डॉ. सोनाली कुलकर्णी यांनी वेशभूषा साकारल्या. ऋषिकेश रोटे, सचिन दलाल, ओम शेवाळे यांनी रंगमंच साहाय्य केले. रवींद्र ढवळे यांनी निर्मिती सूत्रधार म्हणून काम पाहिले.
स्पर्धेत २ आणि ३ डिसेंबरला नाटकाचे सादरीकरण होणार नाही. सोमवारी (ता. ४) नाशिक जिल्हा आहेर सुवर्णकार समाज हरीओम सांस्कृतिक संस्थेतर्फे ‘धर्ममाया’ नाटकाचे प. सा. नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता सादरीकरण होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.