Scenes from the play 'He Kashanen Dhundi Aali'. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha 2023: प्रवृत्तीच्या वर्तमानावर भाष्य ‘ही कशानं धुंदी आली’

प्रतीक जोशी

व्यक्तीला सुखाच्या शिखरावर पोचण्यासाठी समोर त्याच्या प्रवृत्तीत येणारी धुंद प्रत्यक्षात दाखविणारी नाट्यकृती ‘ही कशानं धुंदी आली’ ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या नाशिक केंद्रावरील समारोपाचा प्रयोग बुधवारी (ता. १३) विंध्यावासिनी बालविद्या विकास शिक्षण संस्थेतर्फे सादर झाली.

रोहित पगारे लिखित नाटकाचे भरत कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha Commentary on current trend hi kashan dhundi ali nashik)

प्रत्येक व्यक्तीला आपले जगणे सुंदर करण्यासाठी कसली तरी धुंद हवी असते. या नाट्यकृतीतून समाजातीलच नव्हे तर निसर्गातील अनेक घटकांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य करत प्रकाश टाकण्याची धुंद लेखक आणि दिग्दर्शकाला असल्याचे दिसून आले.

दोन जिवाभावाचे मित्र मात्र त्यांच्यात अगदी क्षुल्लक गोष्टींवरून येणारे वैर, समाजाची तृतीयपंथी लोकांप्रती असणारी भावना, एका वयात येणाऱ्या मुलीला येणाऱ्या मासिक धर्माबाबत असलेली मानसिकता यासह माणूस आणि प्राणी यांच्यातील असलेले सोई सविस्तररित्या या नाट्यकृतीतून प्रेक्षकांपुढे मांडण्यात यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही.

नाटकाच्या सादरीकरणाने अधिकच रंगत आणली. कथाकारांच्या रूपाने नाटकाचे मर्म प्रेक्षकांसमोर आले. प्रत्यक्ष संगीत ही नाटकाची जमेची बाजू ठरली. एकूण या नाटकात प्रेक्षक तल्लीन झाले होते.

भरत कुलकर्णी, रोहित पगारे, पूजा घोडके, हमजा शेख, चैतन्य त्र्यंबके, अवतार कावळे, सागर धोंडगे, प्रशांत पाटील, निकिता भोर, प्रियांका सिंह, राहुल बर्वे, महादेव गवई या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

नेपथ्य सागर धोंडगे, प्रशांत पाटील यांनी, तर प्रकाशयोजना रवींद्र रहाणे यांनी साकारली. माणिक कानडे यांनी रंगभूषा व वेशभूषा साकारल्या. साज तरंग यांनी संगीत केले. अनुजा देवरे यांनी गायन केले. पयाम सिद्दीकी, सुहास दोंदे यांनी रंगमंच व्यवस्था साकारली.

स्पर्धेचा समारोप

राज्य नाट्य स्पर्धेच्या नाशिक केंद्रावरील प्राथमिक फेरीचा समारोप झाला. या वेळी स्पर्धेचे केंद्र समन्वयक राजेश जाधव यांनी परिक्षक, मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखा, सावाना व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT