ज्याप्रमाणे एकाच नाण्याच्या दोन बाजू भिन्न असतात, त्याचप्रमाणे समाजात वावरणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वाच्या स्वभावातील भिन्नता दाखवणारी नाट्यकृती ‘दानव’ ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सोमवारी (ता. ११) सुरभी थिएटर्स संस्थेतर्फे सादर झाले.
अतुल साळवे लिखित या नाटकाचे राजेश शर्मा यांनी दिग्दर्शन केले. (Rajya Natya Spardha danav representing personality differences nashik)
गावी जाणाऱ्या एका जोडप्याच्या प्रवासाच्या एका अनाकलनीय प्रसंगातून नाटकाची सुरवात होते. अथर्व आणि शनाया गाडीने गावी निघालेले असताना गाडी बंद पडते. अशात ते एका खंडरात पोचतात. जिथे त्यांना चांडाली आणि तिचा मुलगा भैरव भेटतो.
यातून सुरू होते, नाटकातील खऱ्या दानवाची गोष्ट. सुप्त आकर्षणातून निर्माण होणारी वासना, दांभिकता, लैंगिक आकर्षण यासह विवाहबाह्य संबंधातून घडणाऱ्या घटना अन् त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर नाटकात भाष्य करण्यात आले आहे.
व्यक्तीच्या डोळ्यांना दिसणाऱ्या रुपापेक्षा त्याच्यातील दानवाला उलगडतानाचा अनुभव प्रेक्षकांना या नाट्यकृतीतून अनुभवायला मिळतो. नयना सनांसे, सृष्टी देव, तानाजी दुघदे, भगवान निकम, संदीप कोते या कलावंतांनी भूमिका साकारल्या.
शैलेंद्र गौतम यांनी नेपथ्य, तर विनोद राठोड यांनी प्रकाशयोजना साकारली. नंदू परदेशी यांनी संगीत दिले. माणिक कानडे यांनी रंगभूषा, तर सई मोने- पाटील यांनी वेशभूषा साकारल्या. शुभम शर्मा, ललित बत्तासे, प्रवीण झोपे यांनी रंगमंच साहाय्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.