episode from the theater play ``Smarnarth''. esakal
नाशिक

Rajya Natya Spardha: दत्तक पद्धतीची नवी संकल्पना 'स्मरणार्थ'

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दाम्पत्याने मुल नाहीतर नातीने आजोबा दत्तक घेतल्याची कहाणी म्हणजे ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत गुरुवारी (ता. २३) सादर झालेली नाट्यकृती 'स्मरणार्थ'.

गिरीश जुन्नरे लिखित या सुरेश गायधनी दिग्दर्शित हे नाटक दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग, नाशिकतर्फे हे सादर करण्यात आले. घरात ज्येष्ठ मंडळींच्या असण्याने कुटुंबाला पूर्णत्व प्राप्त होतं. म्हणूनच त्यांना ज्येष्ठ असे म्हटले जात.

छोट्या, विभक्त कुटुंब पद्धतीचा हव्यास असलेल्या मनोवृत्तीमुळे भोवताली वृद्धाश्रमांची अन् त्यातील सदस्यांची संख्या देखील वाढते आहे.

मात्र काही कुटुंबे अशीही आहेत जेथे आजही लहान मुलांच्या निमित्ताने का होईना ज्येष्ठांची कमी जाणवते. असेच कथानक स्मरणार्थ नाट्यकृतीतून प्रेक्षकांसमोर उभे राहते. (Rajya Natya Spardha New Concept of Adoption System smarnarth nashik)

पहिल्या अंकात एकीकडे वृद्धाश्रमात ज्येष्ठांचा प्रवेश होतो. तर दुसरीकडे धावपळीच्या युगात आई-वडील आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्या मुलीला तिच्या मैत्रिणी आजी आजोबांच्या सहवासातील रम्य आठवणी सांगतात.

त्यातून दत्तक घेणे हे मुलीच्या कानी पडते अन् ती आपण आजोबांना दत्तक घेऊ शकतो का? याचा विचार ती करू लागते. दुसऱ्या अंकात या कुटुंबात आजोबा दत्तक येतात आणि कुटुंब परिपूर्ण होऊन जाते.

केवळ मुल नाही तर वृद्धांना दत्तक घेण्याची अनोखी मात्र काळाची गरज होऊ पाहणारी संकल्पना नाटकातून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

नाटकातील सर्वच पात्रांनी आपल्या अभिनयाने भूमिकांवर पकड कायम ठेवली. वृद्धाश्रम, घराचे नेपथ्य कथानकाला साजेसे होते. प्रकाशयोजना आणि संगीत संयोजन समर्पक ठरले.

पहिल्या अंकात प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवल्याने दुसरा अंक प्रेक्षकांना आकर्षित करणारा ठरला. आजोबा आणि नातं हे समीकरण उत्तमरीत्या नाटकात सादर झाले.

स्वरंग गोऱ्हे, प्रथमेश पाडवी, ऋतुराज भादलीकर, शौनक गायधनी, आदिती मोराणकर, सोहम महाजन, शेखर शिंपी, मानसी भादलीकर, मैत्रेयी गायधनी, अमित मुळे, स्वप्ना विंगळे, गिरीजा वर्तक, पूर्ती पारख, मानसी भादलीकर, सुरेश गायधनी या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या.

नेपथ्य कुंतक गायधनी, संगीत राजन कुलकर्णी यांनी तर मिलिंद फडके यांनी संगीत संयोजन केले. रवी रहाणे यांनी प्रकाशयोजना साकारली. माणिक कानडे यांनी रंगभूषा तर शेखर शिंपी यांनी रंगमंच साहित्याचे नियोजन पाहिले.

आजचे नाटक :

कूस बदलताना

लेखक - भगवान हिरे

दिग्दर्शक -चारुदत्त हिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध- आदित्य ठाकरे

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT