A grand rakhi placed on the main road.  esakal
नाशिक

Rakshabandhan 2023 : 7 फूट उंचीची डिजिटल राखी वेधतेय लक्ष! रक्षाबंधनाचे महत्व जपण्यासाठी येवल्यात धडपड मंचचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. या पारंपरिक सणाची आठवण राहावी व सणाचे एक मंगलमय वातावरण टिकून राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड मंचने विशाल, डिजिटल व आकर्षक रोषणाईने सजवलेली राखी बनवली आहे.

शहराच्या बाजारपेठेत ही राखी लक्षवेधी ठरली आहे. (rakshabandhan 2023 digital 7 foot rakhi made by Dhadpad Manch in Yeola nashik news)

आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही रक्षाबंधन मागची प्रत्येक बहिणीची मंगल मनोकामना असते. हल्लीच्या धकाधकीच्या काळात व्हॉट्सॲप, फेसबुक भ्रमणध्वनी किंवा चॅटद्वारे भेटून एकत्र सण साजरा करण्याचा तात्पुरता असा आनंद भाऊ बहीण उपभोगत असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे या सणवारांचे महत्व कमी कमी होत चालले आहे. या सणाचे पारंपरिक महत्व टिकून राहण्याच्या उद्देशाने येथील धडपड मंचने रक्षाबंधनानिमित्त एक विशाल संपूर्ण डिजिटल राखी बनविली आहे. राखी सुमारे सात फूट उंचीची आहे. विशेष म्हणजे त्याला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मेन रोडवर ही राखी लावली असून, ती लक्षवेधी ठरली आहे. धडपड मंचचे प्रभाकर झळके यांच्या पुढाकाराने मयूर पारवे, दत्ता कोटमे, गोपी दाणी, मुकेश लचके, गोपाल गुरगुडे, दीपक कासले, संदीप बागूल आदींनी ही राखी लावली आहे.

"आम्ही नेहमीच शहराची सांस्कृतिक परंपरा व उत्सवप्रियता जपण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. त्याच हेतूने दरवर्षाप्रमाणे यंदाही राखी लावली आहे. रोषणाईमुळे ही राखी लक्ष वेधून घेत असून, अनेकांनी कौतुक केले आहे." -प्रभाकर झळके, समाजसेवक, येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT