Principal Ravindra Patil, Ramkrishna Patil, Vidya Patil, Manisha Unhwane, Bharat Yadav etc. esakal
नाशिक

Raksha Bandhan: वाकी शाळेत ‘माझी राखी सैनिकांसाठी’! 3 वर्षांपासून राबवला जातोय उपक्रम; 270 राख्यांचे संकलन

विजय पगारे

Rakshabandhan 2023 : तालुक्यातील वाकी येथील प्राथमिक शाळेत ‘माझी राखी सैनिकांसाठी’ उपक्रम झाला. विद्यार्थी व शिक्षकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

सीमारेषेवरील सैनिकांना आपली राखी पोचणार असल्याने विद्यार्थ्यांचा आनंद वेगळाच असतो. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाज्वल्य प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम होत असल्याचे विद्या पाटील यांनी सांगितले.

या उपक्रमात राष्ट्र सेविका समितीच्या वतीने खारीचा वाटा उचलला आहे. हे उपक्रमाचे तिसरे वर्षे आहे. (Rakshabandhan 2023 My Rakhi for Soldiers in Waki ​​School initiative being implemented for 3 years Collection of 270 Rakhis nashik)

विद्या पाटील यांनी शाळेतील राख्या संकलित करून राष्ट्र सेविका समितीच्या सेविका आकांक्षा देशपांडे यांच्याकडे सुपूर्त केल्या. दर वर्षी राष्ट्र सेविका समितीमार्फत या राख्या जवानांपर्यंत पोहोच केल्या जातात.

राखी संकलनासाठी मुख्याध्यापक रवींद्र पाटील, केंद्रप्रमुख रामकृष्ण पाटील, विद्या पाटील,भरत चव्हाण, मनीषा उन्हवणे यांनी प्रयत्न केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पूर्वा काळे, गायत्री डोळस, श्रुतिका कडाळी, तनुष्का काळे, गुंजन परदेशी, अक्षदा डोळस, वृषाली राक्षे, निर्मला भटाटे, श्रद्धा धारे, कार्तिकी गिर्हे, संस्कृती कडू, हर्षदा काळे आदी मुलींसह वेदिका पाटील हिनेही सहभाग घेतला.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी, उपाध्यक्ष नवनाथ काळे यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT