Police Commissioner Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Nitin Jadhav and trustees of the temple at Shri Kalaram temple. esakal
नाशिक

Ram Lalla Pran Pratishtha: पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात भाविकांनी घेतले ‘श्री काळारामा’चे दर्शन! भाविकांची लागली रांग

अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघे नाशिक शहर राममय झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघे नाशिक शहर राममय झाले होते. शहरातील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती.

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही श्री काळारामाचे दर्शन घेत बंदोबस्ताची पाहणी केली. (Ram Lalla Pran Pratishtha Devotees took darshan of Shri Kalaram in strict security of police Devotees crowd nashik)

अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शहरातील मंदिरांमध्ये झगमगाट करण्यात आली. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते.

विशेषत: पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. सायंकाळी याठिकाणी शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा असल्याने त्यापार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन होते.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी श्री काळारामाचे दर्शन घेत बंदोबस्ताचा आढावा घेतला.

वाढत्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांना सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या. याशिवाय, पंचवटीसह भाविकांची गर्दी होणाऱ्या मंदिरांच्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

त्याचप्रमाणे, शहरातील चौकांमध्येही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आरतींचे आयोजन केले गेले होते. अशा ठिकाणीही पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

तसेच, काही संघटनांकडून रॅली काढण्यात आल्या. यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलीसही ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तैनात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: बंगळुरूने तगडा खेळाडू जाऊ दिला, मुंबई इंडियन्सने संधीचं सोनं केलं

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT