Citizens buying bananas at Mushavrat Chowk esakal
नाशिक

Ramdan 2023 : रमजान पर्वात केळीचे दर कडाडले!

जलील शेख

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान पर्व सुरु होताच शहरातील फळबाजार तेजीत आला आहे. बाजारात केळी, चिकू, द्राक्षे, टरबूज, पपई, आंबे, खरबूज आदी फळांची रेलचेल आहे.

गरिबांचे हक्काचे फळ म्हणून ओळखली जाणारी केळी (Banana) महागली आहेत. (Ramadan 2023 the price of bananas increases nashik news)

डझनभर केळीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. टरबूज वगळता इतर सर्वच फळांचे भाव तेजीत आहेत. रमजान महिन्यात मुस्लीम बांधव फळांना विशेष महत्त्व देतात. येथील फळ बाजार रमजान पर्वात नेहमीच तेजीत राहतो. सर्व प्रकारच्या फळांची आवक वाढली आहे. येथे रोज विविध प्रकारची ५० टनांहून अधिक फळांची विक्री होत आहे.

दमदार फळ असल्याने रमजानच्या उपवास काळात गरीब व मध्यमवर्गीय केळीला महत्त्व देतात. पंधरा दिवसापूर्वी २० ते ३० रुपये डझन मिळणारी केळी ६० रुपयावर पोचली आहेत. इतर फळांचे भावही तेजीत असल्याने नागरिकांचे आर्थिक गणित अधिक गुंतागुंतीचे होणार आहे.

यावर्षी केळीसह इतर फळेदेखील महागल्याने मुबलक फळे खरेदी करणे गरिबांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. केळीने गेल्या १५ वर्षात प्रथमच एवढी मोठी उसळी घेतली आहे. केळीचे भाव वाढल्याने ग्राहक हवालदिल झाला आहे. रमजान महिन्यात राज्यासह देशात सर्वत्र केळीची मागणी वाढली आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

येथे गेल्या वर्षी केळी पिकविणाऱ्या गोदामांची संख्या ७० होती. यावर्षी ती घटून ४० वर आली आहे. गेल्या वर्षी रमजान पर्वात ५० टन केळीची येथे रोज विक्री होत होती. भाव वाढल्याने ती यार्षी ३० टनावर आली आहे. घाऊक बाजारात अडीच हजार रुपये प्रती कॅरेट प्रमाणे केळी विकली जात आहे.

मागणीच्या तुलनेत शहरात केळीचा तुटवडा भासत असून आठवड्यानंतर भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. केळीचा कच्चा माल यथे शहादा, जळगाव, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा आदी भागातून येत आहे. खान्देशमधून कच्ची केळी पंजाब, दिल्ली, लखनऊ, उत्तरप्रदेश आदी राज्यात खाण्यासाठी व वेफर्स बनविण्यासाठी जात आहे.

फळांचे दर खालील प्रमाणे

टरबूज - १० रुपये किलो
खरबूज - ४० रुपये किलो
चिकू - ६० रुपये किलो
द्राक्षे - ५० रुपये किलो
पपई - ३० रुपये किलो
आंबा - १५० रुपये किलो

"केळीचे दर प्रथमच वाढले आहेत. रमजान पर्वात भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. केळी महागल्याने विक्रीतही घट झाली आहे. डझनभर केळी घेणारे नागरिक अर्धा डझनवर आले आहेत." - अफरोज बागवान, केळीचे घाऊक व्यापारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT