Ramdas Athavale, Union Minister of State for Social Justice, while speaking at the performance of duty felicitation ceremony on the occasion of Panther Golden Jubilee on Monday. esakal
नाशिक

Ramdas Athawale: आरपीआय- पॅंथर एकत्र काम करतील : रामदास आठवले यांना विश्वास

सकाळ वृत्तसेवा

Ramdas Athawale : पॅंथरची लढाई ही कुठल्या जाती, धर्माविरोधात नसून समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी आहे. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापी सहन करणार नाही.

सर्वसामान्य व्यक्तींच्या न्याय, हक्कांसाठी पॅंथर व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हे यापुढे एकत्रिपणे काम करतील, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. (Ramdas Athawale believes statement RPI Panthers will work together nashik)

दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिर येथे सोमवारी (ता.१०) झालेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, अर्जुन डांगळे, गौतम सोनवणे, विठ्ठल शिंदे, शीला गांगुर्डे, श्रीकांत भालेराव, अर्जुन पगारे यांच्यासह पॅंथरचे पुरस्कार्थी उपस्थित होते.

श्री. आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाषणाची सुरवात केली. 'मी कधी बोलत नाही खोट, म्हणून मला 'पॅंथर'ने केलं मोठं' अशी कविता त्यांनी सादर केली. पॅंथरची लढाई ही सर्वसामान्य व्यक्तींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे.

ही चळवळ चालवत असताना अनेकदा जेलमध्ये गेलो. जेलमध्ये जाण्यासाठी आम्ही कधी घाबरलो नाही. रिपब्लिकन पक्षात अनेक गट असले तरी बाबासाहेबांचा एक विचार सर्वांच्या मनात आहे.

माझ्याविरोधात कुणीही बोलत असले तरी माझे काम सुरू आहे. त्यांच्या बोलण्यामुळे मला काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता मिळवण्यासाठी पक्षाचे आमदार, खासदार निवडून आले पाहिजे.

त्यासाठी इतर समाजाची मते आपल्याला मिळाली पाहिजे, यादृष्टीने आपण काम करायला हवे असे आवाहनही त्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पॅंथर चळवळीत कार्य केलेल्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह, शाल देवून सन्मानित करण्यात आले.

प्रकाश लोंढे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील व्यक्तींनी विचार मांडले. पॅंथरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

'आरपीआय'शिवाय ‘वंचित’अपूर्ण

समाजातील वंचित घटकांना जोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी ही चांगले काम करत आहे.

पण आमच्या रिपल्बिकन पार्टीशिवाय वंचित आघाडी पूर्ण होऊ शकत नसल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. या विधानातून त्यांनी आंबेडकरांना साद तर घातली शिवाय वंचित बहुजनसोबत जाण्याचा विचारही अप्रत्यक्षपणे व्यक्त केला.

चळवळीतील यांचा झाला सन्मान

विकास चाबुकस्वार, नामदेव गायकवाड, डॉ. भरत कारिया, काळू आल्हाट, चंद्रकांत आल्हाट, मिलिंद पाटील, संतोष जोपुळकर, दिगंबर वाघ, संपत जाधव, प्रताप काळे, विलास काळे, चंद्रशेखर काळे,

करीम बादशाह शेख, नाजाबाई सोनवणे, सुरेखाबाई प्रधान, जाईबाई पवार, शांताबाई ब्राह्मणे, शोभाताई अग्रवाल, मानसी बागूल, प्रणाली शिंदे, गौरी घाटोळ, सांची गांगुर्डे, करुणासागर पगारे, शंकरराव काकळीज,

नागसेन चव्हाण, रंजन जगताप, मुरलीधर शेजवळ, फकिरराव जगताप, जयंत भालेराव, बाळासाहेब गांगुर्डे, हरिभजन चावरिया, भिराज जाधव, भानुदास पवार, काभूराज बोढारे, भीमराव खडताळे,

अजय सिंग, सुरेश भवर, हरिश तुलसियानी, भगवंत भालेराव, विवेक गायकवाड, रवींद्र खडांगळे, बाळासाहेब साळवे, अरुण मोरे, दामोदर जगताप यांचा केंद्रीय मंत्री आठवले यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT