Ramesh Bais statement People participation important in Sankalp Yatra for developed India nashik news  
नाशिक

Governor Ramesh Bais: विकसित भारत संकल्प यात्रेत लोकसहभाग महत्त्वाचा : रमेश बैस

सकाळ वृत्तसेवा

Ramesh Bais: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावी लागेल. यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सहभाग वाढवून ही संकल्प यात्रा यशस्वी करावी.

आदिवासी बांधवांना शिक्षित, कौशल्ययुक्त आणि सशक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे योजना राबवित आहे. आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करून कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

मोडाळे (ता. इगतपुरी) गावात मंगळवारी (ता. २१) राज्यपाल बैस यांच्या भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित महाशिबिर कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. (Ramesh Bais statement People participation important in Sankalp Yatra for developed India nashik news )

या वेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्रभारी गटविकास अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते. श्री. बैस म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबीमुक्त भारत’ मोहिमेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.

‘निक्षय मित्र' बनण्यासाठी हजारो नागरिक पुढे आले आणि क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली. या मोहिमेप्रमाणेच प्रयत्न केल्यास लोक कुपोषणाने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. भगवान बिरसा मुंडा यांनी लहान वयात इंग्रजांविरुद्ध बंड करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला आहे.

हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ‘हमारा संकल्प, हमारा भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार पुढे नेणार असल्याची ग्वाही पालकमंत्री भुसे यांनी दिली. तसेच, बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १०० ठिकाणे अंतिम केली असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांचे आदरातिथ्य व नृत्याने राज्यपाल श्री. बैस भारावले. त्यांनी या आदिवासी बांधवांचे कौतुक करून आभार मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी शासकीय योजनांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला श्री. बैस व मान्यवरांनी भेटी दिल्या.

कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे, सरपंच शिल्पा आहेर, सुनीता सदगीर, गुलाब कातोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रास्ताविक तर, मित्तल यांनी आभार मानले.

आदिवासींच्या विकासासाठी सर्वकक्ष प्रयत्न करावेत ः झिरवाळ

इगतपुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, धरणांमध्ये पाणीसाठाही आहे. परंतु, येथील पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने शेती व्यवसायासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या भागात नवीन पाणीसाठे तयार करणे आवश्यक आहे.

तसेच आदिवासी बांधवांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शहरातील मॉलमध्ये जागा मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पर्यटनासाठी इगतपुरी तालुक्याचा परिसर उत्तम असल्याने पर्यटन वाढीसाठी स्टे-होम सारख्या संकल्पना राबविण्यात याव्यात, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वाटप

कृषी विभाग- गेणू मंडोळे,चंद्रकांत सोनवणे, आकांक्षा पवार

आरोग्य विभाग- नवनाथ झोले, गणेश शिंदे, शंकर लहानगे, सखूबाई कन्हाव, सोमनाथ शिंदे, लहानू सराई.

किसान क्रेडिट कार्ड- सोमनाथ खराडे, काशीनाथ गव्हाणे, गोविंद मेडाडे.

एकात्मिक बालविकास योजना- उषा बोडके, अंकिता ढोन्नर

क्रीडा पुरस्कार- रिंकी पावरा, किसन तडवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT