nashik ramzan eid esakal
नाशिक

Ramzan Eid : धार्मिक, पर्यटन स्थळांना भेटीद्वारे ‘बासी ईद’ साजरी; मुस्लिम बांधवांत अमाप उत्साह

सकाळ वृत्तसेवा

Ramzan Eid : बासी आणि तीवाशी ईदनिमित्त मुस्लिम बांधव धार्मिक आणि पर्यटन स्थळी भेट देत आनंद साजरा करत असतात. यंदा रविवारी (ता. २३) बासी ईद असल्याने शहरातील आणि लगतच्या विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळी जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. (Ramzan Eid Celebrate Basi Eid by visiting religious touristic places Immense enthusiasm among Muslim brothers nashik news)

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ईद तीन दिवस साजरी केली जाते. यामध्ये पहिला मुख्य दिवस, दुसऱ्या दिवशी बासी ईद, तर तिसऱ्या दिवशी तीवाशी ईद साजरी होत असते. पहिल्या दिवशी ईदची विशेष नमाज पठण करणे, आप्त स्वकियांच्या भेटी-गाठी घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देणे यासारखे विविध कार्यक्रम होतात.

तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अर्थात्‌ बासी ईद आणि तीवाशी ईदला मुस्लिम बांधव कुटुंबीयांसह शहर- जिल्हा, तसेच जिल्हा बाहेरील पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेट देत दर्शनाचा लाभ आणि पर्यटनाचा आनंद लुटत असतात.

रविवारी बाशी ईदनिमित्त शहर आणि लगतच्या भागातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते. विशेष करून आनंदवली दर्गा आणि पांडवलेणी येथील दर्गा येथे मुस्लिम बांधवांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

अनेक कुटुंबीयांनी जेवणाचा डबा सोबत आणून येथेच दर्शन झाल्यानंतर पिकनिकचा आनंद घेतला. त्यानंतर दर्गा परिसरालगतच्या सोमेश्‍वर धबधबा येथे खेळणे, बागडणे, नदीपात्रात, धबधब्याखाली आंघोळ, बोटिंग करण्याचाही मनमुराद आनंद बच्चे कंपनीने लुटला.

पांडवलेणी येथील दर्गामध्ये दर्शन झाल्यानंतर फाळके स्मारक येथेही अनेक मुस्लिम कुटुंबीयांनी बाशी ईद साजरी केली. येथील वॉटर पार्कमध्ये भिजण्याचा आनंद घेतला. इतकेच नव्हे, तर पांडवलेणी सर करत ट्रेकिंगही केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याचप्रमाणे गंगापूर धरण, वैतरणा धरण, अस्वली, सय्यद पिंपरी अशा विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळीदेखील पर्यटकांची गर्दी दिसून आली. ईद आणि उन्हाळी सुट्ट्या लागून आल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी अधिकच गर्दी दिसून आली.

व्यवसायिकांमध्ये उत्साह

पर्यटन आणि धार्मिक स्थळी ईद आणि उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. धार्मिक स्थळी दर्शनाला जात असताना पर्यटक परिसरातील व्यावसायिकांकडून पूजा साहित्य खरेदी करत होते.

त्यानंतर इतर व्यवसायिकांकडून खाद्यपदार्थ, तसेच आवश्यक असणाऱ्या विविध गोष्टी खरेदी केल्या जात होत्या. त्यामुळे परसरातील विविध वस्तू विक्रेते, व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT