Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा रविवारी (ता.३०) १०० वा भाग प्रसारीत होत आहे.
या पार्श्वभूमीवर येथील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या संकल्पनेतून शहरातील पाठक मैदानावर तब्बल दहा हजार स्क्वेअर फुटाच्या आकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची रांगोळी काढण्यात आली आहे. (rangoli of PM Narendra Modi image was drawn in size of 10 thousand square feet nashik news)
‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित होत असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या संकल्पनेतून शहरातील पाठक मैदानावरील प्रशस्त जागेत १०० बाय १०० फुटाची तब्बल दहा हजार स्क्वेअर फूट नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची रांगोळी आहे.
शनिवारी (ता.२९) सायंकाळी पाचला आमदार दिलीप बोरसे, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम व सुनील मोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आकाशात तिरंगी फुगे सोडून एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
कार्यक्रमास भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, प्रदीप बच्छाव, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा, माजी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, माजी नगरसेवक दिनकर सोनवणे, राकेश खैरनार, महेश देवरे, दीपक अहिरे, जे.डी. पवार, नानु वाघ, प्रकाश सांगळे, युवा मोर्चाचे अनिल पाकळे, शहराध्यक्ष किरण नांद्रे, मीडिया प्रमुख महेंद्र पवार, प्रकाश कुमावत, शिवाजी सोनवणे, हेमंत भदाणे, दिलीप निकम, दत्तू बैताडे, दीपक सोनवणे, नाना मोरकर आदींसह भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
तीन हजार किलो रांगोळीचा वापर
या भव्य रांगोळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी साकारण्यात आली असून ‘मन की बात १००’ ही अक्षरे रेखाटण्यात आली आहेत. यासाठी पांढरा, लाल, पिवळा, निळा, भगवा, काळा, हिरवा आदि रंगांची सुमारे तीन हजार किलो रांगोळी वापरण्यात आली आहे. रांगोळीच्या आजूबाजूला भगव्या कापडाची किनार तयार करून भाजपचे झेंडे आणि पाठीमागे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी सटाणा शहर व तालुक्यातील आबालवृद्धांनी पाठक मैदानावर मोठी गर्दी केली असून पुढील दोन-तीन दिवस ती सर्वांना बघता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.