A rare Powla snake found in Pimpalgaon esakal
नाशिक

Nashik News: पिंपळगाव येथे आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भारतात अतिशय दुर्मिळ असलेला ‘पोवळा’ साप पिंपळगाव बसवंत येथे आढळून आला आहे. टोल नाका येथील सूरज कुयटे यांच्या हॉटेलजवळ हा साप आढळला. त्यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक पिंटू पवार, स्वप्नील देवरे यांच्याशी संपर्क साधला.

ते तातडीने पोचले, पोवळा जातीचा साप असल्याचा अंदाज आला. सर्पतज्ज्ञ सुशांत रनशूर यांनी तो पोवळा साप असल्याचे खात्री केली. अत्यंत दुर्मिळ असलेला हा साप पकडण्यात आला. वनविभागाचे नाना चौधरी, विजय टेकनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आले. (rare Povla snake found in Pimpalgaon Nashik News)

बिळामध्ये पाणी गेल्यावर पावसाळ्यात साप बाहेर पडून लोकवस्तीकडे येत असतात. त्यात दुर्मिळ सापही दिसू लागले आहेत.

नामशेष होत चाललेले अनेक दुर्मिळ वन्यजीव परिसरात सापडत आहेत. काही नागरिक या सापांना भितीपोटी मारतात. क्वचितच आढणारा पोवळा हा साप अतिशय दुर्मिळ आहे व बहुदा या परिसरात या आधी कधी सापडलेला नाही.

असा असतो पोवळा साप….

या सापाला हिंदीत कालाधारी मूगा म्हणतात. इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे आहे तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलीओपीस मेलानुरुस (Calliopfis melanurus) म्हटले जाते. अतिशय दुर्मिळ जातीचा हा साप आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा साप जाडीने कमी असतो. तसेच त्याचा रंग फिक्कट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात. जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यात असतो.

हा साप अतिशय विषारी असून तो मानवी वस्तीत आढळत नाही. या सापाचे विष निरोटॉक्ससिक असल्यामुळे तो चावल्यास सूज येणे, चावलेला भागात यातना होणे.

वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येऊन मृत्यू होणे असे प्रकार घडतात. वन्य जीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत शेड्युल (२) मध्ये समाविष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

138 kg gold seized In Pune: पुण्यात सापडले घबाड! निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी जप्त केले शेकडो किलो सोने; 'तो' टेम्पो कोणाचा?

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs NZ: नशीबानं संधी मिळाली अन् Mitchell Santner ने ७ विकेट्स घेत सोनं केलं; भारताविरुद्ध मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Diwali Festival : दिवाळी सणामुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पणत्या, आकाशकंदील, कपड्यांची सजली दुकाने

Stock Market Crash: शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा! कंपनीचे मालकच विकत आहेत शेअर्स, गुंतवणूकदारांनी काय करावं?

SCROLL FOR NEXT