Speaking in the gathering, District Chief Vijay Karanjkar. Neighborhood Mayor Sudhakar Badgujar, former MLA Vasant Gite, Adv. Yatin Wagh, Vinayak Pandey, senior leader Datta Gaikwad etc. esakal
नाशिक

Rashmi Thackeray : बालेकिल्ल्याच्या डागडुजीसाठी रश्मी ठाकरे मैदानात! महिना अखेरीस महिला मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Rashmi Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किल्ल्याची डागडुजी, नवीन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याबरोबरच विस्कटलेली घडी सरळ करण्यासाठी रश्मी ठाकरे नाशिकच्या मैदानात महिना अखेरीस येत आहे.

महिला मेळाव्याच्या अनुषंगाने पक्षाच्या शालिमार कार्यालयात बैठक झाली. (Rashmi Thackeray Womens meeting at end of month uddhav thackeray group maharashtra politics nashik news)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षबांधणी नव्या जोमाने सुरू झाली असून त्या पार्श्वभूमीवर सौ. ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी या वेळी सांगितले.

मेळाव्याच्या पूर्व तयारीच्या आढावा घेण्यास मध्य नाशिक विधानसभा परिसरातील पक्षाचे तसेच अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक या वेळी पार पडली. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे,

ॲड. यतीन वाघ, उपजिल्हा प्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, माजी नगरसेवक गोकूळ पिंगळे आदींसह मध्य नाशिक विधानसभा परिसरातील शिवसेना व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे तर सूत्रसंचालन उपमहानरप्रमुख सचिन बांडे यांनी केले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

गद्दारांना घाम फोडणारा मेळावा

रश्मी ठाकरे यांचा महिला मेळावा गद्दारांना घाम फोडणारा, न भूतो असाच होईल, असा विश्वास महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या वेळी व्यक्त केला.

पक्षातर्फे महिला आघाडीची जोरदार बांधणी झाली असून, आगामी निवडणुका जिंकून गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा मेळावा महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT