Bird House esakal
नाशिक

Nashik News : पक्षी घरात उंदरांचा उपद्रव; पक्षी घराकडे NMCसह पक्षांची पाठ!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : गुजरात राज्यातील मेहसाना जिल्ह्यात असलेल्या पक्षी घराच्या धरतीवर राज्यातील पहिले पक्षी घर करण्याचा मान हा नाशिकला मिळाला. पंचवटीतील पुरिया पार्क येथे पक्षी घर करण्यात आले. परंतु, महापालिकेने केलेल्या पक्षी घरात उंदरांचा उच्छाद सुरू असून दूरदृष्टी न ठेवता हे काम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Rat infestation in bird house ignorance to bird house of NMC and political parties nashik Latest Marathi News)

माजी नगरसेवक गुरमित बग्गा, माजी नगरसेविका विमल पाटील, नंदिनी बोडके यांच्या संकल्पनेतून जवळपास चौदा लाखाचा निधी खर्च करून पक्षी घर बांधण्यात आले आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, एका वर्षातच या पक्षी घराकडे महापालिकेसह पक्षांनी देखील पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

दिंडोरी नाक्यावरील पूरिया पार्क उद्यानात ६४ फूट उंचीचा मनोऱ्यात ८०० पक्षी घर बांधण्यात आली आहे. यात पाच हजार पक्षी असतील असा अंदाज बांधण्यात आला होता. या पक्षाच्या अन्न ज्वारी व बाजरी तर पाण्यासाठी चार ते पाच कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पक्षाच्या सुरक्षेसाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. परंतु, या पक्षी घराकडे पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे.

पाण्यात शेवाळ

पिण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाण्यात शेवाळ झाले आहे. पक्षासाठी ठेवण्यात आलेल्या धान्यावर उंदीर ताव मारत आहेत. या उद्यानात उंदरांचे बिळे आहेत, याठिकाणी उंदीर मरून पडल्याचे दिसून येते.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

पक्षी बसतात विद्युत तारांवर

या पक्षी वास्तव्य या मुख्य उद्देश होता. मात्र, दिंडोरी नाका या ठिकाणी सदैव वाहनांची वर्दळ असते, अन् गाड्यांचा गोंगाट सुरू असतो. तसेच, या ठिकाणी नागरिक ही असतात. पक्षी हे घराच्या बाजूस असलेल्या विद्युत तारांवर बसलेले आढळून येतात.

"पक्षी घर हे दाट झाडी व शांत ठिकाणी वास्तव्य करतात. पक्ष्यांना आजूबाजूला तलाव नदी असणारे ठिकाण लागते. ते गोंगाट असलेल्या ठिकाणी थांबत नाही. ज्या ठिकाणी पक्षी घर असेल, त्या ठिकाणी, श्वान, उंदीर घूस नसाव्यात. कारण ते प्रजनन केलेले अंडी खाऊन घेतात."

-चंद्रकांत दुसाने, पक्षी मित्र

"ते पक्षी घर नसून तो कबुतर खाना आहे. वेगवेगळे पक्षी, काही असे मनुष्यासारखे इमारती मध्ये शेजारी शेजारी राहत नाही. हे कुठल्याही प्रकारचे न समजता आणि दूरदृष्टी न ठेवता केलेले काम आहे."-शेखर गायकवाड, पर्यावरण प्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT