Child Health esakal
नाशिक

Child Health: 'संसर्गजन्‍य'चे प्रमाण घटले; बालकांत मानसिक- शारीरिक आजारांचे धोके वाढले!

अरुण मलाणी

* चिमुकल्‍यांमध्ये आजारांचे बदलतेय स्वरूप

* संसर्गजन्य रोगांचे प्रमाण घटले

* वर्तनाशी निगडित समस्‍या बनताय गंभीर

नाशिक : काही वर्षांपूर्वीपर्यंत लहान मुलांमध्ये संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण सर्वाधिक होते. परंतु काळानुरूप विशेषतः कोरोनानंतर या आजारांच्‍या स्वरूपात मोठ्या प्रमाणात बदल झालेले असून, शारीरिक व मानसिक आजारांच्‍या धोक्‍यात चिंताजनकरीत्‍या वाढ झालेली आहे. वर्तनाशी निगडित समस्‍या गंभीर बनल्‍या आहेत. कुपोषण, लठ्ठपणा यांसह एकाग्रतेचा अभाव, वस्‍तूमग्‍नता ही भविष्यातील आव्‍हाने असतील, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

कोरोनाकाळात बहुतांश बालके घरीच बसून असल्‍याने सामाजिक संवेदना घटलेल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविलेले आहे. स्‍क्रीनटाइम वाढल्‍याने वस्‍तूमग्‍नता उद्‍भवू लागली आहे. त्यामुळे बालक समाजात न मिसळता गॅझेट्‍समध्ये अधिक प्रमाणात रमत आहेत. यामुळे बौद्धिक व शारीरिक व्‍याधी वाढता आहेत. शहरी भागात लठ्ठपणा, तर ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण अद्यापही चिंताजनक असल्‍याचे डॉक्‍टर सांगतात. (Rate of contagion reduced Increased risk of mental physical diseases in children Nashik News)

...तर भविष्यात मधुमेह, उच्च रक्‍तदाबाचा वाढता धोका

बालकांच्‍या आरोग्‍याची आत्तापासूनच काळजी घेतली नाही, तर येत्‍या काही वर्षांमध्ये कमी वयात मधुमेह, उच्च रक्‍तदाब यांसारखे गंभीर आजार उद्‍भवू शकतात, असे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. कमी वयात हृदयाशी निगडित समस्‍यादेखील उद्‍भवत असून, जीवनशैली त्‍यास कारणीभूत असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढवावे

देशातील अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्ट्रात लहान मुलांच्‍या लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. सुमारे सत्तर ते ऐंशी टक्‍के बालकांचे लसीकरण होत असून, हे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत नेण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे. पोलिओची इंजेक्‍शन स्‍वरूपातील प्रभावी लस नुकतीच अवगत झालेली आहे. याशिवाय काविळ ब, हिब मेंदुज्‍वर, न्यूमोनिया, ग्रोवर, जर्मन ग्रोवर, दोन बूस्टर डोस अशा विविध लसी शासनस्‍तरावर मोफत उपलब्‍ध करून दिलेले आहेत. तर टायफाइडची लसदेखील आगामी काळात मोफत उपलब्‍ध होण्याची शक्‍यता आहे.

राज्‍यभर स्‍कूल हेल्‍थ चेकअप

महाराष्ट्र बालरोगतज्‍ज्ञ संघटनेतर्फे नुकतीच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत राज्‍यभरातील साठ हजारांहून अधिक शाळांमध्ये ‘स्‍कूल हेल्‍थ चेकअप’ अभियान राबविण्याचा प्रस्‍ताव दिलेला आहे. हा अभिनव उपक्रम राबविला गेल्‍यास सर्व शाळांमधील बालकांची आरोग्‍य तपासणी होऊन त्‍यांना वेळीच व योग्‍य उपचार उपलब्‍ध होऊ शकणार आहेत.

बालकांच्‍या आरोग्‍यासाठी हे महत्त्वाचे...

* जन्‍मापासून शिशूचा योग्‍य, परिपूर्ण विकास व्‍हावा

* बालकाच्‍या आरोग्‍यासाठी मातांनी स्‍वतःची घ्यावी विशेष काळजी

* वेळोवेळी लसीकरण करून घेणे आवश्‍यक

* नियमित व्‍यायाम, शारीरिक गतिविधी आवश्‍यक

* योग्‍यरित्‍या शारीरिकवाढीसाठी द्यावा पोषक आहार

* चौकस आहारावर भर देणे अत्‍यंत महत्त्वाचे

* पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा

* स्‍क्रीनटाइम मर्यादित ठेवण्यासाठी करावे प्रयत्‍न

"बालकांमध्ये आजारांचे स्वरूप बदलत आहे. लसीकरणामुळे काही वर्षांपूर्वीच्‍या तुलनेत संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण घटले असले तरी लसीकरणाची टक्‍केवारी आणखी वाढायला हवी. अलीकडील काळात बालक वस्‍तूमग्‍न व्‍हायला लागले असून, त्‍यांच्‍या शारीरिक, बौद्धिक आरोग्‍याची विशेष काळजी घेतली पाहिजे. संघटनेतर्फे राज्‍यस्‍तरावर स्‍कूल हेल्‍थ चेकअप उपक्रमातून सर्व शाळकरी मुलांची आरोग्‍य तपासणी करण्याचा मानस असून, पदाधिकाऱ्यांकडून शासनस्‍तरावर पाठपुरावा सुरू आहे."

- डॉ. रमाकांत पाटील, नियोजित अध्यक्ष, महाराष्ट्र बालरोगतज्‍ज्ञ संघटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT