Tribal servants Ravindra Talpe, Eknath Bhoye, Hemant Chaudhary etc. while giving a statement to Tribal Commissioner Nayana Gunde. esakal
नाशिक

JEE Advance Exam: जेईई ॲडव्हान्सला विद्यार्थी मुकल्याची व्हावी चौकशी : रविंद्र तळपे

सकाळ वृत्तसेवा

JEE Advance Exam : देशभरातील आयआयटी व इतर नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन परीक्षेत यशस्वी होऊनही आदिवासी विद्यार्थ्यांचे ॲडव्हान्स परीक्षा शुल्क भरण्यास आदिवासी आयुक्तांनी नकार दिल्याने राज्यातील १७ पैकी १४ आदिवासी विद्यार्थी या परिक्षेस मुकले आहेत.

या गंभीर प्रकरणाची चौकशी करुन भविष्यात आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता आदिवासी विकास विभागाने घ्यावी, अशी मागणी आदिवासी सेवक रवींद्र उमाकांत तळपे यांनी केली आहे. (Ravindra Talpe statement Inquiry should be made about students missing JEE Advance nashik news)

याबाबत आदिवासी विकास व सुरक्षा असोसिएशनतर्फे आदिवासी आयुक्त नयना गुंडे यांना निवेदन देण्यात आले. निवृत्त सनदी अधिकारी एकनाथ भोये, हेमंत चौधरी व प्रविण सुरुडे या वेळी उपस्थित होते.

देवरी (ता. बोरगाव, जि. गोंदिया) येथील शाळेत २०२२-२३मध्ये इयत्ता बारावीत शिकणारे २७ विद्यार्थी जेईई मेन परीक्षेत यशस्वी झाले. त्यातील १७ मुले जेईई ॲडव्हान्स परिक्षेसाठी पात्र ठरले.

हे सर्व विद्यार्थी अतिदुर्गम भागातील असल्याने, तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे ते परीक्षा शुल्क भरू शकत नव्हते.

त्यामुळे त्यांचे शुल्क शाळेमार्फत भरण्यासाठी गोंदिया प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांनी २१ मार्चला महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीचे सदस्य सचिव तथा आदिवासी विकास आयुक्तांना पत्राद्वारे विनंती केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, आयुक्तांनी २८ मार्चला दिलेल्या पत्रानुसार अद्याप कोणत्याही एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे सदर परीक्षांचे शुल्क स्कूलमार्फत भरण्यात आलेले नाही. दरवर्षी विद्यार्थीच त्यांचे शुल्क भरत असतात.

असे प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविले. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. परिणामी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र झालेल्या १७ विद्यार्थ्यांपैकी फक्त ३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.

तर १४ आदिवासी विद्यार्थी अर्ज भरु शकले नाहीत. शासकीय धोरणामुळे त्यांची संधी हुकली व ते आयआयटी शिक्षणापासून कायमचे वंचित झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT