Namami Goda Project esakal
नाशिक

Namami Goda Project : सिंहस्थाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्पाचे फेरसर्वेक्षण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ‘नमामि गोदा’ प्रकल्प अमलात आणला जाणार आहे. त्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Namami Goda Project : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ‘नमामि गोदा’ प्रकल्प अमलात आणला जाणार आहे. त्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे.

१८०० कोटी रुपयांचा नमामि गोदाम प्रकल्प १ हजार कोटी रुपयांनी वाढून २७८० कोटी रुपयांचा सुधारित प्रकल्प तयार करण्यात आला आहे. (Re survey of Namami Goda project in background of Simhastha nashik news)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर राज्य शासनाला प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर केला जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यापूर्वी केंद्र शासनाच्या जनशक्ती मंत्रालयाकडून महापालिकेला प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

नमामि गोदा प्रकल्पांतर्गत नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून १८०० कोटी रुपयांचा निधीदेखील दिला जाणार आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना गोदावरी प्रदूषणमुक्तीवर भर दिला आहे.

गोदावरी नदीत मिसळणारे नाले बंद करताना सांडपाणी मलनिस्सारण केंद्रांकडे वळविले जाणार आहे. त्यात जुन्या अस्तित्वात असलेल्या मलनिस्सारण केंद्रांमध्ये क्षमतावाढ करण्याबरोबरच जुन्या मलनिस्सारण वाहिन्या बदलल्या जाणार आहे. मलजल वाहिन्या टाकण्यासाठी ५३० कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

नमामि गोदा प्रकल्प व मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी दोन स्वतंत्र प्रस्ताव दिल्ली येथील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याअनुषंगाने महापालिकेकडून फेरसर्वेक्षण करण्यात आले. त्यात २७८० कोटी रुपयांचा नवीन सुधारित प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

नमामि गोदा प्रकल्पांतर्गत मलवाहिकांची दुरुस्ती क्षमतावाढ व सुधारणा करणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे नवीन केंद्र तयार करणे, नवीन विकसित झालेल्या नवनगरांमध्ये मलजल व सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यासाठी वाहिन्या टाकणे, नदी किनारा अत्याधुनिक करणे, गोदावरी नदीवरील वीर घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून ओनर वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे या कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश आहे.

मलनिस्सारण केंद्रांच्या जागेत बदल

मखमलाबाद व कामटवाडे येथे मलनिस्सारण केंद्र उभारणीसाठी जागेची अडचण निर्माण होत असल्याने तपोवन व आगर टाकळी येथे दोन केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. कामटवाडे व मखमलाबाद येथे जवळपास पाच एकर जागेची गरज भासणार असून भूसंपादन करण्यासाठी या विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे

प्रस्तावित नमामि गोदा प्रकल्प व खर्च (रुपये)

- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण सक्षमीकरण व सांडपाणी पुनर्वापर करणे.- ३९८.१८ कोटी

-जुन्या मलवाहिका बदलून नवनगरांमध्ये नवीन मलवाहिकांचे जाळे टाकणे- ९२७.३४ कोटी

-नवीन मलनिस्सारण केंद्र उभारणे- ६२२.०९ कोटी

- नदी घाटांचा विकास व सौंदर्यीकरण करणे.- ८३२.६३ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT