Malegaon City: Mother Vaishali and father Chandrasingh Solunke applauding Aryan for overcoming cerebral palsy in his 12th art class at KBH School. esakal
नाशिक

Inspiration Story :'Cerebral Palsy' वर मात करीत गाठले शिखर

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या जवळपास सर्वच शैक्षणिक सोयीसुविधा शहरातील मुलांना उपलब्ध असतात. पालकही मुलांसाठी तशी धडपड करतात.

मात्र जन्मत:च ज्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते अशा आर्यन सोळुंकेने बारावीच्या कला शाखेत प्रथम येऊन ७८.३३ गुण मिळवून सेरेब्रल पल्सीच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला. (Reached peak by overcoming Cerebral Palsy Aryan of Malegaon secured 78 percent and stood first in Class XII Arts Nashik News)

शिक्षक दांपत्य चंद्रसिंग सोळुंके व वैशाली ठोके यांचा हा मुलगा. जन्मतःच आजाराने ग्रस्त असल्याने आर्यनला बालपणापासूनच सर्व शारीरिक क्रियांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत होते.

वर्षानुवर्षे दररोज न चुकता फिजिओथेरपी करून त्याने अपंगत्वावर बऱ्याच अंशी मात केली आहे. अनेकदा त्याच्या छोट्या मोठ्या शस्त्रक्रियाही झालेल्या आहेत. बालपणापासून तो आपली प्रत्येक सुट्टी मुंबईला उपचारासाठी म्हणजेच फिजिओथेरपीसाठी घालवत होता.

अथक व्यायाम आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर तो आज आधाराने चालू लागला आहे. हे सर्व करताना त्याला अभ्यासासाठी खूपच कमी वेळ मिळत. या परिस्थितीत तो कॉलेज किंवा खासगी क्लासेसलाही जाऊ शकत नव्हता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र बालपणापासूनच त्याला अवांतर वाचनाची प्रचंड आवड होती. कुठल्याही खासगी क्लासशिवाय स्वयंअध्ययनाच्या जोरावर आर्यनने केबीएच कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला.

पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याचा त्याचा मानस आहे. आर्यनने कठोर परिश्रम, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाला गवसणी घातली, असे त्याचे वडील चंद्रसिंग सोळुंके यांनी सांगितले.

यशाचे श्रेय आई- वडील,लेखनिक हितेश गोसावी व महाविद्यालयीन शिक्षक यांना देतो. या यशाबद्दल मुख्याध्यापक कैलास दाभाडे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकांना देतो. आर्यनचे हे यश प्रेरणादायी असून जीवनात इच्छाशक्ती महत्त्वाची असते हे त्याने दाखवून दिले आहे.

"सेरेब्रल पल्सी' ने ग्रस्त असतानाही प्रचंड आत्मविश्वास, वाचनाची आवड यातून केलेल्या अभ्यासाने यश मिळवता येते हे आर्यनने दाखवून दिले.

खडतर परिश्रम व जिद्द असली की कशावरही मात करता येते. महाविद्यालयाचे सहकार्य पाठबळ देणारे ठरले."

- चंद्रसिंग सोळुंके, आर्यनचे वडील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT