real estate esakal
नाशिक

Dasara 2023: विजयादशमी मुहूर्तावर रिअल इस्टेट बाजार तेजीत! रेडी पझेशन फ्लॅटसह फार्महाऊसला मागणी

सकाळ वृत्तसेवा

Dasara 2023 : विजयादशमीचा मुहूर्त साजरा करण्यासाठी नाशिकमधील रिअल इस्टेट मार्केट सज्ज झाले आहे.

शहरात सुरू असलेल्या दोन हजाराहून अधिक प्रोजेक्ट वर रेडी पझेशन फ्लॅटला मागणी आहे, तर समृद्धी व सुरत चेन्नई ग्रीन फील्ड महामार्गाच्या पार्श्वभूमीवर फार्महाउसलादेखील मागणी वाढली आहे. (Real Estate Market Booms on Vijayadashami Muhurta Demand for Farmhouse with Ready Possession Flat nashik)

कोरोनामुळे नाशिकचे रिअल इस्टेट मार्केट काही प्रमाणात मंदीच्या छायेत होते. मात्र मागील वर्षापासून रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू झालेली तेजी यंदाही कायम आहे. गणेशोत्सवापासून सुरू झालेले तेजी विजयादशमीलादेखील कायम आहे.

दिवाळीपर्यंत खरेदी-विक्रीचा ट्रेंड असाच कायम राहील, असा दावा बांधकाम व्यावसायिकाकडून केला जात आहे. नाशिकमध्ये सद्यःस्थितीत दोन हजाराहून अधिक प्रोजेक्टवर काम सुरू आहे.

यात जवळपास बारा हजारहून अधिक फ्लॅट रेडी पझेशनमध्ये असून स्ट्रक्चर उभे दिसत असल्याने मागणी वाढली आहे. विशेष करून गोविंदनगर, गंगापूर रोड, वडाळा गाव शिवार, पाथर्डी शिवार, आनंदवली शिवार, पंचवटीतील मखमलाबाद म्हसरूळ या भागात रेडी पझेशनला अधिक मागणी आहे.

मुंबई ठाण्याप्रमाणेच नाशिकमध्येदेखील उंच इमारतींचा ट्रेंड आला आहे. उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यावरील फ्लॅटला अधिक मागणी आहे.

त्यामुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर पाचशेहून अधिक बांधकाम साइटवर बुकिंग तेजीत राहील, असा दावा बांधकाम व्यवसायिकांकडून केला जात आहे.

विजयादशमीचा मुहूर्त साधत जवळपास ३०० हून अधिक नवीन प्रकल्प नाशिकमध्ये होऊ घातले असून, मंगळवारी (ता.२४) त्याचे भूमिपूजन होणार आहे.

फार्महाऊस ट्रेंड

नाशिकमध्ये फार्महाऊस ट्रेंड आता रुजला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच सापुतारा भागातील, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, दिंडोरी तालुका, नाशिक तालुक्यातील इगतपुरी व सिन्नरच्यामधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फार्महाऊस तयार होत आहे.

समृद्धी महामार्गामुळे मुंबईहून येणे अधिक सोपे होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील फार्महाऊसला मागणी वाढली आहे. चार ते पाच गुंठ्यातदेखील फार्महाऊस उपलब्ध असल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे.

दक्षिण मुंबईतून विकएंडसाठी समृद्धी महामार्ग इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथे दीड तासात पोचता येत असल्याने या भागातील फार्महाऊसची मागणी गृहीत धरून त्याअनुषंगाने फार्महाऊस तयार झाले आहे.

"नाशिकमध्ये रिअल इस्टेटचे मार्केट तेजीत असून रेडी पझेशन प्लॅटला तसेच फार्महाऊसलादेखील मागणी वाढली आहे."- कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो, नाशिक .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT