नाशिक : कोरोना दुसरी लाट (corona second wave) ओसरल्यानंतर बंद पडलेल्या बांधकाम उद्योगाची गाडी रुळावर येत असल्याचे दिसत असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाने गौण खनिजांच्या वाहतुकीवर बंदी आणल्याने परिणामी शहरात सुरू असलेली सत्तर टक्के बांधकामे बंद पडली आहे. बांधकाम साहित्यावरील बंदी न हटल्यास येत्या काळात संपूर्ण बांधकामे बंद पडून रिअल इस्टेट (real estate) क्षेत्र पुन्हा आर्थिक गर्तेत अडकणार असून, हजारो नागरिकांना दिवाळीपर्यंत सदनिका देणे अवघड होणार आहे. (real-estate-sector-back-in-financial-crisis-nashik-marathi-news)
कोरोना दुसरी लाट ओसरल्यानंतर सुलतानी संकट
कोरोना पहिल्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे बांधकाम व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. या दरम्यान, हजारो बांधकाम मजूर, कामगारांनी गावाकडे स्थलांतर केले. ऑक्टोबर महिन्यात लाट ओसरल्यानंतर बांधकाम व्यवसायाची गाडी रुळावर येण्यास मदत झाली. मात्र, या वर्षी फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा कोरोना दुसरी लाट सुरू झाल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्र पूर्णपणे गडगडले, पुन्हा कामगारांना स्थलांतरण करावे लागले. आता पुन्हा टप्प्याटप्प्याने बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर येत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने रेती, मुरूम, खडी, डबर या बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर बंदी आणली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहरातील बांधकाम क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले असून, सध्या रॉयल्टी भरून साठविलेल्या मालावर काम भागविले जात आहे. पुढील आठ दिवस जेमतेम बांधकामाच्या साइट चालतील, अशी परिस्थिती आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्र शंभर टक्के बंद पडेल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
बांधकाम क्षेत्रात आधीच उल्हास
अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील बांधकाम क्षेत्र अनेक समस्यांना तोंड देत असताना राज्य शासनाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला मंजुरी दिल्याने पुढील काही वर्षे या क्षेत्रामध्ये तेजी निर्माण होईल, असे चित्र आहे. परंतु, गौण खनिजावरील बंदीमुळे या क्षेत्रावर सुलतानी संकट निर्माण झाले आहे. सध्या शहरात अर्धवट स्थितीतील हजारो बांधकाम प्रकल्प आहे. गौण खनिज वाहतूक बंद केल्याने प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. दिवाळीपर्यंत ग्राहकांना घरांचा ताबा द्यायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा व्यवसाय बंद होत आहे. कोरोना तिसरी लाट निर्माण झाल्यास पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम अन्य व्यवसायावर होतात. बांधकाम व्यवसायाशी संलग्न सव्वाशे व्यवसाय आहेत. त्यावरही परिणाम होऊन करोडो रुपयांचे व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे.
गौण खनिजांचे उत्खनन बंद करण्यात आल्याने रिअल इस्टेट क्षेत्रावर त्याचे परिणाम होत आहे. खडी, मुरूम, रेती, डबर बंद झाल्याने साइट ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे कामगार पुन्हा गावाकडे स्थलांतर करण्याची भीती आहे. - रवी महाजन, अध्यक्ष, नाशिक क्रेडाई मेट्रो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.