The Vanishing Wada Culture of Old Nashik Area. and Village area awaiting development  esakal
नाशिक

Nashik News: जुने नाशिकच्या विकासाचे स्वप्न यंदाही अपूर्णच

शहराची सुरवात म्हणून नावलौकिक असलेल्या जुने नाशिक भागाचा विकासास घेऊन अनेकांनी विविध स्वप्न दाखवले.

- युनूस शेख

शहराची सुरवात म्हणून नावलौकिक असलेल्या जुने नाशिक भागाचा विकासास घेऊन अनेकांनी विविध स्वप्न दाखवले. कागदावर असलेला गावठाण विकासाचा अजेंडा २०२३ मध्ये प्रत्यक्षात नावारूपास येईल, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती.

प्रत्यक्ष मात्र इतर वर्षाप्रमाणे यंदाचे वर्षही केवळ आश्वासनानेच गेल्याने रहिवाशांचा घोर अपेक्षाभंग झाला. २०२४ मध्ये तरी जुने नाशिकच्या वाट्याला आलेले अविकासाचे दारिद्र्य दूर होईल का, असे प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केले. - युनूस शेख (recap 2023 dream of development of old Nashik is also incomplete this year news)

जुने नाशिक परिसरास अनेक इतिहास आहेत, पौराणिक संस्कृतीचा वारसा आजही येथे जपला जातो. असे असताना हा भाग विकासापासून नेहमी वंचित राहिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकास परिसराचा विकास करून देण्याची आठवण होत असते. निवडणूक गेल्यास ‘रात गई बात गई’ अशी परिस्थिती येथे बघावयास मिळते.

२०२२ दरम्यान गावठाण विकासास घेऊन रहिवाशांनी उपस्थित केलेले प्रश्न लक्षात घेता आमदार, खासदारांनी इतकेच नव्हे तर नगरसेवकांनीदेखील विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत २०२३ वर्षात रहिवाशांना सुंदर स्वप्न दाखवले. अवघ्या काही दिवसात स्वप्न आणि आश्वासनाच्या वर्षाचा समारोप होणार आहे.

विकास मात्र अद्याप झालेला नाही. जुने नाशिकच नाही तर शहराची पुरातन वाडा संस्कृती विकासाअभावी लोप होताना दिसत आहे.

अनेक वाडे ढासळून जुन्या खंडारमध्ये रूपांतर झाले आहे. अरुंद गल्लीबोळीमुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासूनही वंचित राहावे लागत आहे.

वीज वितरण विभागाच्या उच्च दाबाच्या तारी भूमिगत करण्याचे दिवा स्वप्नात राहिले आहे. त्यात अतिक्रमणाची मोठी भर पडली आहे. वाडा माफिया यांच्यामुळे गावठाण विकासास खीळ बसत असल्याचेही बोलले जात आहे. अशाप्रकारे इतर वर्षाप्रमाणे यंदाचे वर्षही जुनी नाशिककरांसाठी अविकसित वर्ष ठरले.

सिटीलिंक बस सेवेस खीळ

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरवातीचा मान असलेल्या जुने नाशिक परिसरातील सिटीलिंक बससेवेस सरत्या वर्षात खीळ बसली आहे. शहरात सिटीलिंक बस व्यवस्था सुरू झाल्यानंतर जुने नाशिक परिसरातही मिनी सिटीलिंक बससेवा सुरू करण्याचे विचारधन होते. परिसरातील नागरिकांसह शहराच्या अन्य भागातील नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले होते. गावठाण विकासाअभावी आजही परिसरात अरुंद रस्ते आहे. तेही अतिक्रमणाने व्यापून घेतले आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि येथील समस्या लक्षात घेता, येथील सार्वजनिक बससेवेस ब्रेक लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT