election esakal
नाशिक

Market Committee Election : बाजार समित्यांसाठी विक्रमी 2420 अर्ज दाखल; दिग्गजांच्या अर्जाने निवडणुकीत रंगत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, सोमवारी (ता. ३) अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी इच्छुकांनी गर्दी केली होती. १४ बाजार समित्यांमधील २५२ जागांसाठी विक्रमी दोन हजार ४२० अर्ज प्राप्त झाले आहेत.

यात सोसायटी गटात एक हजार ४६१, ग्रामपंचायत गटात ६७८, व्यापारी गटात १८३, हमाल मापारी गटातील ९८ अर्जांचा समावेश आहे. सुरगाणा बाजार समितीत सोसायटी गटातील चार, ग्रामपंचायत गटातील एक, तर व्यापारी गटातील दोन जागा बिनविरोध झाल्या.

प्राप्त अर्जांची ५ एप्रिलला छाननी होणार असून, ६ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, सर्वच बाजार समित्यांमध्ये दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. (Record 2420 applications filed for Market Committees election nashik news)

प्रतीक्षेत असलेल्या बाजार समित्यांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे बाजार समितीत इच्छुकांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सर्वाधिक ३०९ अर्ज दाखल झाले, तर सुरगाणा बाजार समितीत सर्वांत कमी २५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने तसेच शेतकऱ्यांना उमेदवारीचा हक्क बहाल केल्याने उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रामुख्याने सर्वच बाजार समित्यांमध्ये दोन्ही गटांतील इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.

यात प्रामुख्याने दिंडोरी बाजार समितीत माजी सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक गणपतबाबा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, भाऊलाल तांबडे, विलास कड, पिंपळगाव बाजार समितीत आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, गोकुळ गिते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार, दीपक शिरसाठ, प्रणव पवार, दीपक बोरसे, भास्कराव बनकर, राजेश पाटील, संदीप गडाख, किरण निरभवणे, नाशिक महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, नाशिक बाजार समितीत माजी खासदार देवीदास पिंगळे, शिवाजी चुंभळे,

कल्पना चुंभळे, नितीन देवीदास पिंगळे, दिलीप थेटे, छाया नामदेव हलकंदर, प्रल्हाद काकड, निवृत्ती अरिंगळे, सुरेश गंगापुत्र, भाऊसाहेब खांडबहाले, लासलगाव बाजार समितीत जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, पंढरीनाथ थोरे, सुवर्णा जगताप, राजेंद्र डोखळे, चांदवड बाजार समितीत विद्यमान सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे,

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, ‘मविप्र’चे संचालक सयाजीराव गायकवाड, सुकदेव जाधव, संजय जाधव, कारभारी आहेर, देवळा बाजार समितीत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या धनश्री आहेर, माजी सभापती योगेश आहेर, घोटी बाजार समितीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर लहाने आदींचा समावेश आहे.

गणेश गिते, पवारांचा पिंपळगावसाठी अर्ज

पिंपळगाव : नाशिक महापालिकेच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या माजी स्थायी सभापती गणेश गिते यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार अनिल कदम यांच्याकडून व्यापारी गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर राजकारणात किंगमेकरची भूमिका निभावणारे प्रणव पवार यांनी प्रथमच या निवडणुकीत अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवार, गिते यांच्या उमेदवारीने पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीला वेगळा आयाम मिळणार आहे.

बाजार समिती सोसायटी गट ग्रामपंचायत गट व्यापारी गट हमाल मापारी एकूण

नाशिक १०८ ४६ १८ ३ १७५ पिंपळगाव १९७ ८६ १९ ७ ३०९

लासलगाव १२४ ६२ १९ ६ २११

दिंडोरी १०१ ४९ १४ ८ १७२

कळवण ७३ ४४ ८ ७ १३२

देवळा ९७ २९ १२ ९ १४७

चांदवड १०९ ५७ १५ १२ १९३

मालेगाव ११९ ६१ १६ ६ २०२

नांदगाव ८१ ४८ १३ ७ १४९

मनमाड ८८ ३४ १९ ९ १५०

येवला १३१ ६२ ११ १३ २१७

सिन्नर १११ ४८ १४ ७ १८०

सुरगाणा १५ ८ २ - २५

घोटी १०५ ४३ ९ ३ १५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT