Record profit for MAMCO Bank this year Nashik News esakal
नाशिक

यंदा MAMCO बॅंकेला विक्रमी नफा

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील अर्थकारणाचा कणा असलेल्या दि मालेगाव मर्चन्टस् को- ऑपरेटिव्ह बँकेस (MAMCO) ३१ मार्च २०२२ अखेर अल्प मनुष्यबळात कामाचे अचूक नियोजन, अनावश्यक खर्चास कात्री, पारदर्शक कारभार, संचालक मंडळाचे एकमताचे निर्णय, सुरक्षित व नफाक्षम कर्जवाटप धोरण या पंचसूत्रीमुळे पाच कोटी ४९ लाख रुपये ढोबळ विक्रमी नफा झाल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष गौतम शहा यांनी मंगळवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री. भोसले म्हणाले, की आरबीआयच्या नियमानुसार (RBI) सर्व तरतुदी वजा जाता बँकेस दोन कोटी ११ लाख १८ हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने एकूण २७३ कोटी ९६ लाखांच्या विक्रमी ठेवी मिळवून सभासदांचा विश्‍वास दृढ केला आहे. कोरोनाकाळात बँकेने कर्जाच्या २० टक्के अतिरिक्त कर्जपुरवठा केल्याने संबंधितांचे व्यवसाय पूर्वपदावर येणार आहेत. त्यांची कर्ज परतफेड क्षमता वाढून पर्यायाने बँकेची ही नफा क्षमता वाढली. लघुव्यावसायीक व फेरीवाल्यांनाही व्यवसायात प्रगतीसाठी बँकेने २५ हजारांचे विनातारणी कर्जवाटप सुरू केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लघुव्यावसायिकांची सावकारी कर्जातून सुटका झाली.

बँकेची कॅम्प शाखा स्वमालकीच्या जागेत अत्याधुनिक इमारतीत बांधली जाईल. चालू आर्थिक वर्षात एनपीएचे प्रमाण कमी करणे, कर्जवाटपात वाढ करणे, नफा क्षमता वाढविणे, शाखा स्थलांतर, शाखा नूतनीकरण, एटीएम (ATM), पॉस, तसेच इतर डिजिटल सेवा (Digital service) सुरू करण्याचा मानस आहे. इश्युअर सेवेस एनपीसीआयमार्फत परवानगी मिळाल्याने बँकेचे एटीएम कार्ड इतर बँकांच्या एटीएमवर वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस संचालक शरद दुसाने, सतीश कासलीवाल, दादाजी वाघ, संजय दुसाने, भरत पोफळे, सतीश कलंत्री, भिका कोतकर, विठ्ठल बागूल, छगन बागूल, संचालिका मंगला भावसार, तज्ज्ञ संचालक भास्करराव पाटील, बालचंद छाजेड, उपेंद्र मेहता, सरव्यवस्थापक कैलास जगताप, कर्ज अधिकारी विलास होनराव, वसुली विभागप्रमुख मिलिंद गवांदे, राधेशाम जाजू, किरण पारीख, संजय अहिरे आदी उपस्थित होते.

एनपीए कमी करण्यात यश

काही वर्षांपासून नियोजनबद्ध वसुलीमुळे बँकेची थकबाकी १६ कोटी ४१ लाख इतकी कमी होऊन निव्वळ एनपीएचे (NPA) प्रमाण बँकेच्या इतिहासात प्रथमच ५.८३ टक्केपर्यंत कमी करण्यात यश आले. एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. कर्जदारांनी कायदेशीर कारवाईचा कटुप्रसंग टाळण्यासाठी कर्जावरील व्याजाचा/हप्त्याचा नियमित भरणा करावा. अथवा अल्पबचत प्रतिनिधीद्वारा कर्जाचे व्याज व मासिक हप्ता भरण्याच्या सोयीचा लाभ घ्यावा, असेही राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

* बँकेचे सभासद - २२ हजार ३१७

* कर्जवाटप- १४३ कोटी ८३ लाख

* बँकेचा एकूण निधी- ३६ कोटी ७८ लाख

* गुंतवणूक- १५६ कोटी ८० लाख

* गुंतवणुकीत वाढ - १८ कोटी ५८ लाख

* भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर)- १५.५८ टक्के

* बँकेचा नेटवर्थ - २३ कोटी ६४ लाख

* भागभांडवल- सात कोटी ५८ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT