MPSC esakal
नाशिक

MPSC Bharti News : ‘एमपीएससी’तर्फे उच्च शिक्षणात 378 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर..

सकाळ वृत्तसेवा

MPSC Bharti News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उच्चशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या विविध संवर्गातील पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बुधवारी (ता. १८) प्रसिद्ध केलेल्‍या चार वेगवेगळ्या जाहिरातींतून एकूण ३७८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाते आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. २०)पासून सुरू होत आहे.

यापूर्वी शासकीय महाविद्यालयांसाठी गेल्‍या महिन्‍यात आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्‍यापाठोपाठ उच्च व तंत्रशिक्षण विभागातील उच्चशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. निवड प्रक्रियेबाबत सविस्‍तर तपशील जाहिरातीत मांडलेला आहे. (Recruitment for 378 Posts in Higher Education by mpsc nashik news)

त्‍यानुसार अर्जांची संख्या उपलब्‍ध आयोगाच्‍या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्‍त असेल आणि अर्ज सादर केलेल्‍या सर्व पात्र उमेदवारांच्‍या मुलाखती घेणे सोयीस्‍कर नसल्‍यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाणार आहे. त्‍यादृष्टीने शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्‍य योग्‍य निकष यांच्‍या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित केली जाणार आहे.

चाळणी परीक्षा झाल्‍यास या परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरीत्या विचारात घेऊन त्‍याआधारे शिफारस केली जाणार आहे. मुलाखतीत किमान ४१ टक्क्‍यांपेक्षा जास्‍त गुण मिळालेल्‍या उमेदवारांनाच शिफारशीसाठी विचारात घेतले जाणार आहे, असे आयोगाने स्‍पष्ट केले आहे.

...असा आहे भरतीचा तपशील

- शासकीय कला, वाणिज्‍य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विषयांतील अधिव्‍याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) या संवर्गातील पद भरती. उपलब्‍ध जागा ८६. भौतिकशास्‍त्र १४, रसायनशास्‍त्र व गणिताचे प्रत्‍येकी दहा, भाषा विषयांसह अन्‍य विषयांचा समावेश.

- शासकीय महाविद्यालय, संस्‍थेमधील सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ महाविद्यालयीन शाखा या संवर्गातील पदभरती. उपलब्‍ध जागांची संख्या २१४. सर्वाधिक २१ जागा भौतिकशास्‍त्र, २० जागा रसायनशास्‍त्रातील, संख्याशास्‍त्र, गृहशास्‍त्राच्‍या प्रत्‍येकी १५, वनस्पतिशास्त्र शाखेच्‍या १३, प्राणिशास्‍त्र, अर्थशास्‍त्र, मानसशास्‍त्र या विषयांच्‍या प्रत्‍येकी १२ जागांचा समावेश. ३३ विषयांसाठी ही भरतीप्रक्रिया.

- शासकीय महाविद्यालय, संस्‍थेमधील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या संवर्गातील पद भरती. उपलब्‍ध जागांची संख्या ४६. २२ विषयांसाठी ही भरती होणार आहे.

- शासकीय महाविद्यालय, संस्‍थेमधील प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) या संवर्गातील पद भरती. उपलब्‍ध जागांची संख्या ३२. वेगवेगळ्या २० विषयांसाठी भरती.

महत्त्वाच्‍या तारखा अशा-

- अर्ज सादर करण्याचा कालावधी : २० ऑक्‍टोबर ते ९ नोव्‍हेंबर

- ऑनलाइन पद्धतीने परीक्षाशुल्‍क भरण्याची अंतिम मुदत ः ९ नोव्‍हेंबरपर्यंत

- एसबीआयमध्ये चलनाद्वारे परीक्षाशुल्‍क भरण्यासाठी चलन प्रत घेणे ः ११ नोव्‍हेंबरपर्यंत

- चलनाद्वारे परीक्षाशुल्‍क भरण्याची अंतिम दिनांक : १३ नोव्‍हेंबर (बँकेच्‍या कार्यालयीन वेळेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT