Sport  esakal
नाशिक

Sport Guide Recruitment : राज्यात 153 क्रीडा मार्गदर्शकांची ‘साई’च्या धर्तीवर बाह्यस्त्रोतद्वारे भरती

सकाळ वृत्तसेवा

Sport Guide Recruitment : राज्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी राज्य सरकारने भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (साई) धर्तीवर बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शकांची भरती करण्यास मान्यता दिली.

त्यांतर्गत ५३ क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी दरमहा ६० हजार आणि १०० सहायक क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी महिन्याला ४० हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. (Recruitment of 153 sports guides in state through outsourcing on lines of Sports Authority of India nashik news)

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर १५३ क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणीनिहाय पदे मानधन तत्वावर निर्माण करण्याचा निर्णय १५ जुलै २०१० ला घेण्यात आला होता. मात्र, नियुक्ती करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने २३ ऑगस्ट २०१९ ला सुधारित नियमावली जारी करण्यात आली. मात्र, मानधन अल्प असल्याने क्रीडा मार्गदर्शक उपलब्ध झाले नाहीत. आता सरकारने क्रीडा मार्गदर्शकांची श्रेणी नव्याने निर्माण केली.

क्रीडा मार्गदर्शकांसाठी किमान बारावी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान, वय किमान २५ ते कमाल ५५ वर्षे अशी अट असेल. क्रीडा मार्गदर्शक पदासाठी एन. आय. एस. पदविकाधारक अथवा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू असणे आवश्‍यक असेल.

सहायक क्रीडा मार्गदर्शकासाठी या क्रीडाविषयक अर्ह्यतेच्या जोडीला राष्ट्रीय अथवा राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त, शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडू, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू आदीचाही विचार केला जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही दोन्ही पदे चार वर्षांसाठी भरण्यात येतील. दरवर्षी मूल्यांकन करुन गुणांकन ६० पेक्षा कमी असल्यास सेवा समाप्त केली जाईल. प्रत्येक चार वर्षांनी निविदा काढून बाह्यस्त्रोत यंत्रणेतर्फे ही पदे भरण्यात येतील. मात्र, राज्य सरकार अथवा निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यात सहभागी होता येणार नाही.

क्रीडा मार्गदर्शक, सहायक क्रीडा मार्गदर्शक म्हणून निवड झाल्यावर पूर्णवेळ सरकारच्या विभागीय तथा जिल्हा, तालुका क्रीडा संकुल केंद्रात प्रशिक्षण देतील. कामाचे तास निश्‍चितीचे अधिकारी क्रीडा व युवक सेवा आयुक्तांना देण्यात आले आहेत. याच आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एजन्सीची नियुक्ती कार्यवाही होईल.

निवड प्रक्रियेसाठी गुणांकन निश्‍चित करण्यात आले आहे. ते असे : खेळनिहाय कौशल्य चाचणी- ७५, शैक्षणिक अर्हता- पदव्युत्तर पदवी, बारावी, अनुभव- संगणकाचे ज्ञान यासाठी प्रत्येकी ५ गुण. मूल्यांकनासाठी क्रीडा व युवक सेवाच्या संबंधित विभागीय उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल.

क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्त्या ॲथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग, हॉकी, फूटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, आर्चरी, जिम्नॅस्टीक, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टींग, शुटींग, ज्युदो, कबड्डी, खो-खो, तायक्वांदो, मल्लखांब, तलवारबाजी, लॉन टेनिस या खेळांसाठी असेल.

जिल्हानिहाय क्रीडा मार्गदर्शकांची संख्या

क्रीडा मार्गदर्शक आणि सहायक क्रीडा मार्गदर्शकांची संख्या अनुक्रमे अशी : मुंबई शहर- ३-२, मुंबई उपनगर- १-३, पालघर- १-३, ठाणे- १-३, रायगड- १-३, नाशिक- ३-२, धुळे- १-३, नंदूरबार- १-३, जळगाव- १-३, पुणे- ३-३, नगर- १-३, सोलापूर- १-३, कोल्हापूर- ३-२, सांगली-१-३, सातारा- १-३, रत्नागिरी- १-३, सिंधुदुर्ग- १-३, औरंगाबाद- ३-२, जालना- १-३, परभणी- १-३, हिंगोली- १-३, बीड- १-३, लातूर-३-२, नांदेड- १-३, उस्मानाबाद- १-३, नागपूर- ३-२, वर्धा- १-३, भंडारा- १-३, गोंदिया- १-३, गडचिरोली- १-३, चंद्रपूर- १-३, अमरावती-३-२, अकोला- २-२, वाशिम- १-३, यवतमाळ- १-३, बुलढाणा- १-३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT