recruitment in anganwadi esakal
नाशिक

Anganwadi Recruitment: अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांची भरती! पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Anganwadi Recruitment : इगतपूरीतील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसपदांची भरती प्रक्रिया होणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी पंडीत वाकडे यांनी केले आहे. (Recruitment of Anganwadi Maids and Helpers Posts Eligible candidates invited to apply nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या पदासाठीची शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण व वय १८ ते ३५ दरम्यान असावे. विधवांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे असेल. उमेदवार त्याच महसुली गावचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी ५ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.

तसेच, मदतनीस पदासाठी बेलगांव कुऱ्हे, कृष्णनगर, खंबाळे, कावनई, घोटी बुद्रुक, त्रिंगलवाडी, कोरपगांव, मानवेडे, बोरटे, भावली खुर्द, गव्हाडे, खडकेद, आवळखेड, कांचनगांव, निरपण, पिंपळगाव मोर, काळुस्ते, अडसरे खुर्द, बारशिंगवे, धामणगांव, पिंपळगाव डुकरा, भरविर खुर्द, धामणी, धारगांव, शेवगे डांग आदी एकुण ३४ गावांमध्ये ४५ पदांसाठी भरती होणार आहे.

माहीतीसाठी इगतपुरी प्रकल्प कार्यालय किंवा संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्यावी. जास्तीतजास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्री. वाकडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT