Nashik Municipal Hospital Bharti: महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ५६ डॉक्टर व ४० सहय्यक मनुष्यबळ, अशा एकूण ९६ जागा मानधनावर सहा महिने भरण्यासाठी दोन कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालये व ३० शहरी आरोग्य केंद्रे आहेत. (Recruitment of assistants including doctors in municipal hospitals nashik news)
त्यात आता नवीन १०५ आरोग्य उपकेंद्र सुरू केली जाणार आहेत. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत असले तरी मनुष्यबळाचा तुटवडा आहे. विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची १८९ पदे मंजूर आहेत. त्यातील ६५ डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी मानधनावर डॉक्टर भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी ४५ डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरतीप्रक्रिया सुरू आहे.
शासनाने दिलेल्या परवानगीनुसार ८४ डॉक्टर भरले जाणार होते; मात्र ही प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे ५६ डॉक्टरांसह ९६ पदे मानधनावर भरली जाणार आहे. त्यासाठी खर्चाला मंजुरी देण्यात आली.
सहा महिन्यांसाठी भरती असेल. त्यासाठी दोन कोटी ३८ लाख ५० हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांना ४० हजार ते ७५ हजारांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. ४६ डॉक्टर्ससाठी एक कोटी ९२ लाख ९० हजार रुपये, २० स्टाफ नर्ससाठी २४ लाख रुपये, तर वीस एएनएमसाठी २१ लाख ६० हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.