Recruitment  esakal
नाशिक

Recruitment: कोतवाल, पोलिसपाटील पदांची भरती सुरू! सिन्नरला कोतवालांची 13, तर पोलिसपाटलांची 32 पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा

Recruitment News : महसूल विभागामार्फत रिक्त असलेल्या कोतवाल आणि पोलिसपाटील पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.

गेल्याच आठवड्यात निफाड येथे प्रांताधिकारी कार्यालयात पोलिसपाटील पदांसाठी आरक्षण सोडत काढली. त्यापूर्वी कोतवालपदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. (Recruitment of Kotwal Police Patil posts started Sinnar has 13 posts of kotwals and 32 posts of police officers vacant nashik)

सिन्नर तालुक्यात कोतवालांची १३ व पोलिसपाटलांची ३२ पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या दोन्ही पदांसाठी गावनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे.

त्यानुसार आवश्यक पात्रता असेल, त्यांनीच ऑनलाइन अर्ज सादर करावेत. पात्रता नसलेल्या व आरक्षित प्रवर्गात समाविष्ट नसलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करू नयेत, असे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी केले आहे.

अर्जदारांना अर्ज भरण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी आल्यास सिन्नर तहसील कार्यालयात संपर्क साधावा. कोतवालपदाच्या खुल्या प्रवर्गासाठी ६००, तर मागासप्रवर्गासाठी ५०० रुपये परीक्षा शुल्क असून, प्रक्रिया शुल्क बँक प्रोसेसिंग चार्जेस वगळून आहे.

ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरल्यास निवडलेल्या पर्यायानुसार आवश्यक ते बँकेचे सेवा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनी त्यांचा व्यवहार यशस्वी झाल्याची खात्री करणे गरजेचे आहे. ऑनलाईन होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी पूर्णत: उमेदवारांची असणार आहे.

कोतवालपदासाठी रिक्त जागांचे गावनिहाय आरक्षण.

-अनुसूचित जाती : जायगाव, पांढुर्ली

-अनुसूचित जाती महिला : वावी, सर्वसाधारण : मऱ्हळ बुद्रुक, वडांगळी, आगासखिंड, शहा, पंचाळे,

-सर्वसाधारण महिला : हरसुले

-इतर मागास प्रवर्ग : सोमठाणे

-इतर मागास प्रवर्ग महिला : निमगाव सिन्नर

-दुर्बल घटक : चिंचोली,

-दुर्बल घटक महिला : ठाणगाव

पोलिसपाटीलपदासाठी गावनिहाय आरक्षण

-अनुसूचित जाती प्रवर्ग : ब्रह्मणवाडे

-अनुसूचित जाती महिला राखीव : कोळगाव माळ, गुलापूर, खोपडी खुर्द, वडांगळी

-विशेष मागास प्रवर्ग : दोडी बुद्रुक, शिवडे

-इतर मागास प्रवर्ग : डुबेरे, पाथरे बुद्रुक, बेलू, सोनारी, कुंदेवाडी, हरसुले, पिंपरवाडी, बोरखिंड, ठाणगाव, महाजनपूर, पाडळी

-इतर मागास प्रवर्ग महिला राखीव : देवपूर, सोमठाणे, कणकोरी

-इडब्ल्यूएस प्रवर्ग : लक्ष्मणपूर (झापवाडी), गुरेवाडी, माळवाडी (दत्तनगर)

-खुला प्रवर्ग : पिंपळगाव (धनगरवाडी), मेंढी, देवपूर, पंचाळे, पास्ते,

-खुला प्रवर्ग महिला राखीव : उजनी, चंद्रपूर, रामनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT