tomato  esakal
नाशिक

Tomato Crisis: शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा ‘लाल चिखल’! आर्थिक नुकसान, तेजीतील टोमॅटोचे दर नीचांकी पातळीवर

एस. डी. आहिरे

Tomato Crisis : दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या २० किलोच्या प्रतिक्रेट्‌सला दोन ते अडीच हजार रुपये भाव होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने टोमॅटोचे पीक घेतले.

दुष्काळ स्थितीत टँकरने पाणी देऊन शेतकऱ्यांनी पीक फुलविले. आता तेजीत असणारे टोमॅटोचा बाजार नीचांकी पातळीवर पोचला आहे.

केंद्राची नेपाळी टोमॅटोची आयात शेतकऱ्यांना भोवली, असा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे जणू शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा ‘लाल चिखल’ झाला आहे. (red mud of farmers dreams Economic losses booming tomato prices at low levels Tomato Crisis nashik)

बाजारात येणारी विक्रमी आवक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अक्षरशः मुळावर उठली आहे. साधारण महिना-दीड महिन्यांपूर्वी सफरचंदापेक्षा जादा म्हणजे तब्बल १५० ते २०० रुपयांपर्यंत गेलेला टोमॅटोचा दर सध्या सहा रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

वाहतूक खर्च निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात लिलावाला न लावता फेकून दिले, तर काहींना न तोडताच जागेवर ठेवले. यातून टोमॅटोचा लाल चिखल झाला.

प्रतिकिलो १५० ते २०० रुपये भाव गेलेला पाहून आपल्याही टोमॅटोचा बक्कळ पैका होईल, या भाबड्या आशेवर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या भ्रमनिरास झाला. उत्पन्न आणि फायद्याची गोष्ट सोडा, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत १५ दिवसांपूर्वी सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्रेट टोमॅटोचा दर होता. तो आता शंभर रुपयांवर गडगडला आहे. यामुळे शेतकरी संघटनांकडून प्रतिकिलोस अनुदान देण्याची मागणी जोर धरत आहे.

दोन महिन्यांपूर्वी बाजार गाजवणाऱ्या टोमॅटोची घसरण अद्याप थांबलेली नाही. ऑगस्टमध्ये टोमॅटोचा बाजारभाव ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवरून सद्यःस्थितीत १५ ते २० रुपयांपर्यंत आला आहे.

म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा बाजारभाव कमी झाला. केंद्र सरकारने नेपाळमधून दहा टन टोमॅटो आयातीचे करार केले. त्यामुळे दर कोसळले. ऑगस्टच्या सुरवातीला टोमॅटोचा घाऊक बाजार सरासरी ६० ते ७० रुपये प्रतिकिलो होता.

आता मात्रा तो घसरला आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारला फक्त शेतमाल दिसतो. तो सोडून इतर वस्तूंच्या किमती कमी का होत नाहीत? आम्ही जगावे की मरावे, असे टोमॅटो उत्पादकांनी सांगितले.

चांगला दर मिळेल, या अपेक्षेने टंचाईसदृश काळातही टोमॅटोच्या लागवडी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने टोमॅटो उत्पादकांचा विचार न करता दर नियंत्रित करण्यासाठी मागील महिन्यात टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली. बाजारभावात मोठी घट झाल्याने टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुबई, बांगलादेशला निर्यात

पिंपळगाव बाजार समितीत सध्या टोमॅटोचा बोलबाला आहे. जिल्ह्याभरातून दररोज सुमारे दोन लाख क्रेट आवक होत आहे. चवदार व कवडी फुटलेला दर्जेदार टोमॅटो परदेशात पोचत आहे.

पिंपळगाव बाजार समितीतून दररोज दुबई, बांगलादेश येथे ५० हजार क्रेटची निर्यात होत आहे. आवकेतील २५ टक्के निर्यात होऊनही बाजारभावाला आधार मिळत नाही.

टोमॅटोचे अर्थकारण

- एकरी लागवडीचा खर्च एक लाख रुपये (बियाणे, खते, फवारण्या, तोडणी व वाहतूक)

- एकरी अंदाजित उतारा एक हजार क्रेट्‌स (२० किलोचा एक क्रेट्सप्रमाणे)

- लागवड खर्च व नफा धरून अंदाजे अपेक्षित भाव - २५० ते ३०० रुपये क्रेट्‌स

- सध्या बाजारात भाव १०० ते १५० रुपये (प्रतिक्रेट्स)

"टोमॅटो लागवडीचा खर्च भरपूर असतो. त्याशिवाय त्यावर रोगाचा प्रादूर्भाव अधिक होत असल्याने त्याचे संरक्षण फवारण्या घेऊन अधिक प्रमाणात करावे लागते. मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे लागवड खर्चात वाढ होऊ लागली आहे. सध्याचे बाजारात मिळणारे दर अत्यंत कमी असल्याने त्यातून वाहतूक खर्चही निघत नाही."-शरद सोमवंशी, शेतकरी, चांदवड

"बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढली. परिणामी, त्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन हजार रुपये प्रतिक्रेट्सचा दर वाढलेल्या आवकेमुळे औटघटकेचा ठरला. लागलीच आवक वाढल्याने दर कोसळले."- सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT