NMC election latest marathi news esakal
नाशिक

नाशिकमध्ये OBCच्या एका जागेत घट; 36 ऐवजी 35 नगरसेवक

विक्रांत मते

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने (SC) ओबीसींसाठी आरक्षण कायम ठेवल्याने महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) २६ जुलैला नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून (State election commission) प्राप्त सूचनेनुसार ओबीसींसाठी ३५ जागा राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओबीसींच्या (OBC) आरक्षित जागांची रचना करताना पूर्णांक संख्या गृहीत धरल्याने नगरसेवकांची संख्या एकने घटली आहे. (Reduction in one OBC seat in Nashik 35 corporators instead of 36 Nashik nmc election Latest Marathi news)

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण कायम केल्याने यापूर्वी राबविलेले अनुसूचित जाती- जमातीचे आरक्षण वगळता, न्यायालयाने निश्चित केलेल्या ओबीसींच्या आरक्षित जागांवर सोडत काढली जाणार आहे.

महापालिकेच्या एकूण ४४ प्रभागांमध्ये १३३ जागा आहेत. अनुसूचित जाती-जमातीवगळता उर्वरित १०४ सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागांमधून ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणानुसार ३६ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. १३३ जागांच्या तुलनेत २७ टक्के आरक्षणानुसार ३५.९१ टक्के आरक्षण होते. त्यामुळे ओबीसींच्या ३६ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या.

५ ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आता ओबीसींच्या ३५ जागांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. २९ जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.

३० जुलै ते २ ऑगस्टदरम्यान प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत राहील. त्यानंतर ५ ऑगस्टला प्राप्त हरकती व सूचनांची छाननी करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली.

निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे

-एकूण लोकसंख्या (२०११ नुसार) : १४ लाख ८६ हजार ५३

-अनुसूचित जाती लोकसंख्या : दोन लाख १४ हजार २०

-अनुसूचित जमाती लोकसंख्या : एक लाख सात हजार ४५६

-नगरसेवकांची संख्या : १३३

-महिलांसाठी राखीव : ६७

-सर्वसाधारण : ६९ (सर्वसाधारण महिला ३४)

-अनुसूचित जाती : १९ जागा (महिला राखीव १० जागा)

-इतर मागासवर्गीय : ३५ जागा (१८ महिला राखीव)

-एकूण प्रभाग : ४४

-तीन सदस्यांचे ४३ प्रभाग

-चार सदस्यांचा एक प्रभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT