Queue of vehicles esakal
नाशिक

Monsoon Tourism: पहिने रोडवर वाहनांची होईना चेकिंग; पोलिस बंदोबस्त तरी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Update : पावसाळा सुरू झाला की त्र्यंबक रोडवरील पहिने येथे पर्यटकांची वीकएंडला गर्दी होत असते. रविवारी (ता. २३) रिमझिम पाऊस असताना सकाळपासून पर्यटकांची तोबा गर्दी केली होती.

त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या ताफ्यालाही बसला. तसेच, पहिने फाट्यावर नाकाबंदी केली असली तरी वाहनांचा मात्र कोणत्याही प्रकारची चेकिंग केली जात नव्हती.

त्यामुळे पहिने परिसरात तरुणांकडून मद्याच्या धुंदीत मौजमजा केली जात होती. त्याचा त्रास कुटुंबीयांसह वर्षासहलीवर आलेल्या पर्यटकांना होत होता. (Regular checking of vehicles on roads Long queue of vehicles despite police presence nashik)

पहिने हे गेल्या काही वर्षात पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातून कोसळणारे धबधबे आणि खळाळणारे ओढ्यात मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी गर्दी होत असते.

अनेकदा या ठिकाणी काही विपरीत घटनाही घडल्या आहेत. ओढ्यांमधील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तरीही तरुणाई जीव धोक्यात घालून डोंगरांवरील धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात, तरी काही धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात.

रविवारीही मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पहिने रोडवर मोठी वाहतूक कोंडी झालेली पहावयास मिळाली. पहिनेच्या रस्त्यालगत पर्यटक त्यांची दुचाकी-चारचाकी वाहने पार्क करून निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात. परंतु यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

त्र्यंबक रोडवरील पहिने फाटा येथे ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती. परंतु पहिनेकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात नव्हती. बहुतांशी तरुणाई पहिने परिसरात येताना मद्याच्या बाटल्या वाहनातून घेऊन येतात आणि त्या ठिकाणी मद्यपान करून मौजमस्ती करीत असतात.

असे असतानाही पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात नव्हती. एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट बेधडकपणे पोलिसांसमोरून पहिनेकडे जात होते. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता परंतु कारवाई मात्र होताना दिसत नव्हती.

पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी व मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्रस्त पर्यटकांनी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पायलट व्हॅनच कोंडीत

पहिने गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या ओढ्याजवळच पर्यटकांनी त्यांची वाहने पार्क केलेली होती. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी- चारचाकी पार्क केलेल्या होत्या. त्यामुळे कोंडी झाली होती.

कोंडी सोडविण्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलिसांसह ग्रामीण मुख्यालयाचे पोलिस कर्मचारी व ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. पोलिसांचे गस्ती वाहनही रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या कारचालकांवर कारवाई करीत होते.

परंतु वाहने पार्क करून गेलेले पर्यटक जागेवर नसल्यावर पोलिसांचाही नाइलाज होत होता. धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांकडून पर्यटकांना मज्जाव केला जात होता. परंतु पर्यटक दुसऱ्या मार्गाने वाटा शोधून जात होते.

या वाहतूक कोंडीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वाहनाच्या ताफ्यालाही फटका बसला. ताफ्याची पायलट व्हॅनच कोंडीत सापडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT