Regular cleaning in every ward including hospital porch in nashik civil hospital news 
नाशिक

Nashik Civil Hospital: ना दुर्गंधी.. ना अस्वच्छता... एकदम चकाचक...! नाशिक जिल्हा रुग्णालय टाकतेय कात

जिल्हा रुग्णालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करताना दूर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

नरेश हाळणोर

Nashik Civil Hospital : जिल्हा रुग्णालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करताना दूर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु दररोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतानाही आता मात्र रुग्णालयात प्रवेश करताना कोणालाही नाकाला रुमाल लावण्याची गरज पडत नाही, इतकी स्वच्छता नियमित होते आहे.

एवढेच नव्हे तर, रुग्णांनाही किळस यावी इतके घाण असणारे वॉर्डमधील स्वच्छतागृहही आता चकाचक पाहताना अनेकांना सुखद धक्काच बसला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या कानमंत्रामुळे कधी नव्हे ते जिल्हा रुग्णालय कात टाकताना दिसते आहे. (Regular cleaning in every ward including hospital porch in nashik civil hospital news)

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता ही जणू पाचवीलाच पुजलेली होती. जीर्ण झालेली इमारत, दररोज येणारे हजारोच्या संख्येने रुग्ण आणि अनियमित स्वच्छतेमुळे रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डातून येणारी दूर्गंधी यामुळे जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेत असायचे. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छता गृह असतानाही त्याचा वापर करताना दाखल रुग्णांना नाक मुठीत धरूनच करावा लागत असे. वॉर्डमध्ये नियमित स्वच्छता नसल्याने दूर्गंधी असायची. याबाबत नेहमीच जिल्हा रुग्णालयावर टीकाही होते. परंतु निर्ढावलेले प्रशासन आणि कर्मचार्यांवर याचा काहीही परिणाम होत नव्हता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाचा चेहरा-मोहराच बदलताना दिसू लागल्याचे सहज जाणवते आहे. जिल्हा रुग्णलयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापासूनच स्वच्छता नजरेमध्ये भरते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील पोर्चसह प्रत्येक वॉर्डमध्ये नियमित साफसफाई करण्याचे आदेशच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिले आहेत.

त्याचप्रमाणे, प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छतागृहांचीही दिवसातून किमान तीन वेळा स्वच्छतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे रुग्णालयातील पोर्चपासून ते वॉर्डपर्यंत, रुग्णांच्या बेडपासून ते शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागापर्यंत स्वच्छता दिसून येते आहे. अगदी रुग्णालयातील सिलिंग फॅनचीही स्वच्छता केली जात आहे. बंद पडलेले पंखे दुरुस्त करण्यात आले आहेत. बाहयरुग्ण विभागात नियमित साफसफाई केली जात आहे.

कधीही राऊंड

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी गेल्या महिन्यात दिवाळीपूर्वी जिल्हा रुग्णालयात रुजू झाले. पाहणी केल्यानंतर सर्वप्रथम रुग्णालयाच्या स्वच्छतेची समस्या मार्गी लावण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामांचे वाटप करून देताना डॉ. शिंदे रुग्णालयात कधीही राऊंड घेऊ लागल्याने अस्वच्छता दिसताच जाब विचारला जाऊ लागल्याने कर्मचारीही कामाला लागले. कामचुकार करणार्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयांमध्ये बदल्या करण्यात आल्या.

कामांचे मोबाईलवर फोटो

स्वच्छता कर्मचार्यांकडून करण्यात येणाऱ्या कामांचे फोटो काढून ते जिल्हा शल्यचिकित्सकांसह अधीक्षकांनाही पाठविण्यात येऊ लागले. एकदाच होणारी स्वच्छता आता नियमित होऊ लागल्याने दूर्गंधी येणे बंद झाले. वॉर्डही चकाचक दिसू लागले. रुग्णांनाही आता प्रसन्न वाटावे असे स्वच्छता दिसू लागली आहे.

कामाची पावती

नेहमी रुग्णांशी संबंधित कामानिमित्ताने येणारे सेवाभावी वा सामाजिक कार्यकर्तेही रुग्णालयाची स्वच्छता पाहून कर्मचार्यांचे कौतूक करतात. तसेच, आर्वजून जिल्हा शल्यचिकित्सकांचीही भेट घेऊन रुग्णालयातील स्वच्छतेचे कौतूक करीत आहेत.

"जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांला प्रसन्न वाटले पाहिजे. त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. ज्यासाठी नियुक्ती केली आहे त्या कामाला प्राधान्याने करा. काम करायचे नसेल तर जागा रिकामी करा, अनेकांच्या हातांना काम नाही, त्यांना काम मिळेल. रुग्णालयाची स्वच्छता महत्त्वाची आहे." - डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सट्टाबाजारात कोणाला पसंती? कोणाची सत्ता येणार?

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

SCROLL FOR NEXT