नाशिक : वाढती नागरी वस्ती, वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या महारेल (Maharail) कंपनीने महापालिकेला (NMC) नाशिक रोड विभागात तीन रेल्वे उड्डाणपूल (Flyover) उभारण्याचा दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला.
उड्डाणपुलासाठी दोन्ही बाजूला भूसंपादनासह बांधून देण्याची अट टाकण्यात आल्याने दोन्हींचा खर्च परवडणार नसल्याचे कारण देण्यात आले आहे. विहीतगाव येथील रेल्वे उड्डाणपूल गरजेचा असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
नाशिक रोड विभागातील वाढत्या वाहतुकीवर जालीम उपाय ठरला असता, असे मत व्यक्त केले जात आहे. (rejected proposal of 3 railway flyover nashik latest Marathi news)
महारेल कंपनीने महापालिका हद्दीतून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करताना तीन ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल किंवा रेल्वे बोगदा बांधण्याचे प्रस्तावित केले.
नाशिक रोडच्या स्टेशनवाडी भागात रेल्वे, मेट्रो तसेच सिटी बससाठी मल्टी मोडल हब तयार केले जाणार असल्याचे पार्श्वभूमीवर महारेल कंपनीने महापालिकेला त्याअनुषंगाने पवारवाडी, कारागृहामागील गोरेवाडी व विहीतगाव ते खर्जुल मळा या भागाला जोडणारा रस्त्यावर मालधक्का येथे असे तीन उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव दिला.
नागरी वस्ती वाढत असल्याने कारागृहातील कैदी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होवू शकतो, असे उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेत म्हटले होते. गोरेवाडी येथे उड्डाणपूल उभारताना उच्च न्यायालयाच्या त्या निर्देशाचा आधार घेण्यात आला. पूल उभारण्यासाठी रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला भूसंपादन आवश्यक आहे.
त्यामुळे भूसंपादनाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच सध्या आवश्यकता नसल्याने उड्डाणपूल बांधण्यास नकार देण्यात आला. पवारवाडी येथे रस्त्याची मिसिंग लिंक असल्याने पूल शक्य नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले, तर विहीतगाव येथे रेल्वेने पूल उभारावा असे उत्तर महापालिकेने दिले आहे. त्यामुळे महारेल कंपनीने महापालिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून तीन उड्डाणपूल तयार करण्याचे प्रस्ताव गुंडाळल्यात जमा आहे.
...तर वाहतुकीला लाभ
विहीतगावकडून सिन्नरकडे वाहनांना जाण्यासाठी खर्जुल मळा मार्ग असला तरी रेल्वेचे गेट असल्याने ट्रेनच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्याशिवाय रस्ता अरुंद असल्याने मध्यम व मोठी वाहने बिटको, सिन्नर फाटा मार्गे जातात. प्रस्तावित भागात उड्डाणपूल झाल्यास देवळाली कॅम्प, भगूर भागाकडून सिन्नरकडे जाणारी वाहतूक या मार्गाने वळविणे शक्य आहे. तर मल्टी मोडल हबच्या दृष्टीनेदेखील उड्डाणपूल फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.