godavari river esakal
नाशिक

Nashik News: धार्मिक पर्यटकांनी साधली ‘विकेन्ड’ची पर्वणी! पंचवटीतील सर्वच मंदिरे भाविकांच्या गर्दीने ओसंडली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यासह परराज्यातील भाविकांनी दुसरा शनिवार व रविवारच्या सुटीचे औचित्य साधल्याने गोदाघाटावरील वाहनतळावर मोठी गर्दी उसळली आहे. भाविकांच्या आगमनाने पंचवटीतील धार्मिक पर्यटन जोरात आहे.

दुसरीकडे भाविकांच्या गर्दीने श्रीराम मंदिर, कपालेश्‍वर, सीतागुंफा याठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती. तपोवनातील निसर्ग सौंदर्याबरोबरच अनेकांना स्वामीनारायणाच्या देखण्या मंदिरानेही भुरळ घातली. (Religious tourists enjoy Weekend All temples in Panchvati were overflowing with devotees Nashik News)

यंदा तब्बल १९ वर्षांनंतर येऊ घातलेल्या अधिक श्रावणमासाच्या तोंडावर शहरातील धार्मिक पर्यटनासाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यातच विकेंडचे औचित्य साधत पर्यटक भाविकांची वाहने शनिवारी (ता. ८) सकाळपासूनच रामतीर्थ परिसरात दाखल होऊ लागली होती.

येथील म्हसोबा व गौरी पटांगण याठिकाणी महापालिकेने भाविकांची वाहने उभी करण्यासाठी नाममात्र शुल्कात व्यवस्था केली आहे. याठिकाणी कालपासून भाविकांनी रामतीर्थातील स्नानानंतर समोरील श्री कपालेश्‍वर, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा आदी ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली.

सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या काही वर्षांपासून श्री काळाराम देवस्थानच्या पूर्व दरवाजाने प्रवेश दिला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तपोवनात उसळली गर्दी

भाविक पर्यटकांची श्री काळाराम, कपालेश्‍वरानंतर गोदाकाठावरील निसर्गरम्य तपोवनाला पसंती मिळत आहे.

सध्या गोदापात्र प्रवाही नसले, तरी पावसाळ्यामुळे तपोवन परिसरातील हिरवाई पर्यटकांना आकर्षिक करत आहे. पर्यटक भाविकांच्या वाढत्या गर्दीने येथील छोट्या व्यवसायांच्या अर्थकरणासही काही प्रमाणात बुस्ट मिळाला आहे.

स्वामी नारायण मंदिराचे आकर्षण

मुंबई- आग्रा महामार्गालगतच्या नवीन शाही मार्गावर गतवर्षी उभारण्यात आलेले स्वामी नारायण मंदिर पर्यंटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.

देखण्या मंदिरासह येथील सुंदर कोरीव काम, सुंदर शिल्पे, स्वच्छता, शेजारून वाहणारी गोदावरी यांची पर्यटक भाविकांना भुरळ पडत आहे. शनिवार-रविवार व सुटीच्या दिवशी याठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते, यावरून येथील गर्दीची कल्पना यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT