Loading the camels into the truck before leaving for Rajasthan  esakal
नाशिक

Nashik News : शहरातील उर्वरित 5 उंट राजस्थानकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील पाडळदे शिवारात जप्त केलेल्या ५८ उंटापैकी ५३ उंटांची यापूर्वीच घरवापसी सुरु झाली होती.

दरम्यान निळगव्हाण येथील गो शाळेत असलेल्या एका बछड्यासह उर्वरित पाच उंटही बुधवारी (ता. २४) ट्रकने राजस्थानकडे रवाना करण्यात आले. (remaining 5 camels from city send to Rajasthan nashik news)

काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुका पोलिसांनी उंटांची तस्करी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले होते. या कारवाईत ५८ उंट जप्त झाले होते. या प्रकरणी तालुका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले उंट निळगव्हाण येथील गोशाळेत ठेवण्यात आले होते.

स्थानिक वातावरणाचा त्रास हात असल्याने उंट दगावत होते. अखेर जप्त केलेल्या ५३ उंटांची तपासणीनंतर रविवारी (ता. २१) घरवापसी करण्यात आली होती. हे उंट नाशिक, पेठ, अहवा मार्गे धरमपूर येथे पोचणार होते. साधारणत: रोज २५ ते ३० किलोमीटर अंतर कापत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशक्त असल्याने चार मोठे उंट व एक लहान बछडे निळगव्हाण गोशाळेत होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले.

उंटांची प्रकृती उत्तम असली तरी ते पायी जाण्याच्या स्थितीत नसल्याने बछड्यासह उंटांना बुधवारी (ता.२४) ट्रकने धरमपूरकडे रवाना करण्यात आल्याचे डॉ. खाटीक यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT