Remedial instructions to employees about dengue by nmc nashik news esakal
नाशिक

Nashik Dengue Disease: डेंगी थैमानानंतर महापालिका यंत्रणेला जाग; कर्मचाऱ्‍यांना उपाययोजनांच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Disease : डेंगीने थैमान घातल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी (ता. २७) कर्मयोगीनगर भागात भेट देवून माहिती घेतली, कर्मचाऱ्‍यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या. कालिका पार्क, जगतापनगरसह प्रभाग २४ मध्ये घरोघरी तापाने फणफणणारे रुग्ण असून, त्यांची डेंगी चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. दोन संशयितांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने डास निर्मूलन व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशन यांच्यासह नागरिकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Remedial instructions to employees about dengue by nmc nashik news)

बांधकाम साइटवर पाण्याचा साठा असल्याने ही ठिकाणे डेंग्यू डासांची उत्पत्तीस्थाने झाली आहेत. बांधकामाची माती व इतर साहित्य नाल्याच्या कडेला व रस्त्यावर टाकले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली होती.

नगररचनाचे उपअभियंता रवींद्र बागूल, प्रदीप भामरे यांनी गुरुवारी बांधकाम साईटला भेट दिली. पाणी साठवू नये, माती व इतर मटेरिअल रस्त्यावर टाकू नये, अशा सूचना बांधकाम व्यावसायिकांना दिल्या. जीवशास्त्रज्ञ राजेंद्र त्र्यंबके यांनी शुक्रवारी पथकासह या भागात ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याच्या सूचना दिल्या. डेंग्यू संशयित रुग्ण आढळलेल्या इमारतींच्या परिसराची पाहणी केली.

डास प्रतिबंधक फवारणी करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. परिसरातील नागरिकांशी चर्चा करून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहिती दिली. डेंगी संशयितांची संख्या जास्त असलेल्या भागात घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार असल्याचे त्र्यंबके यांनी सांगितले.

या वेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), मगन तलवार, राहुल काळे, घनश्याम सोनवणे, जी. एस. गांगुर्डे आदींसह नागरिक हजर होते. प्रभागात दोन दिवसांपासून डास निर्मूलन मोहीम सुरू झाली असून, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली जात आहेत. फवारणी केली जात आहे.

बांधकाम विभाग ढिम्म

आयुक्तांना निवेदन दिले गेले, शहर अभियंता नितीन वंजारी यांची वेळोवेळी भेट घेवून माहिती देण्यात आली. असे असताना बांधकाम विभाग ढिम्म आहे. कर्मयोगीनगर येथील नाल्यालगत रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ढिग गेल्या सहा वर्षापासून हटविले जात नाहीत. रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या साफ केल्या जात नाहीत.

यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाचे हेतुपुरस्कर होणारे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहे. वेळीच दखल घेवून उपाययोजना न केल्यास शिवसेना (ठाकरे गट) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनतर्फे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनी दिले पुरावे

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

SCROLL FOR NEXT