त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : कोरोनाचे संभाव्य संकट लक्षात घेऊन उपाययोजनांना सुरवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमण संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पौष वद्य एकादशीच्या यात्रेपूर्वी अतिक्रमण निर्मूलन करत रस्ते मोकळे करण्यात येणार असल्याचे समजते. पण या मोहिमेत पुन्हा राजकारण्यांच्या हस्तक्षेपाच्या चर्चेने संशयाची सुई निर्माण झाली आहे. (Removal of encroachments before Nivrittinath Yatra Trimbakeshwar roads compressed Nashik news)
संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला पंढरपूरसारखे महत्तव् वारकऱ्यांमध्ये आहे. ज्ञानियांचे गुरू व ज्येष्ठ बंधू संत निवृत्तिनाथांना वारकरी शंभू शंकराचा अवतार मानून पूजन करतात. ज्ञानियांच्या राजाच्या यात्रेला यंदा भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सरकार आणि प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जातील. मात्र सध्या अतिक्रमणाने त्र्यंबकेश्वरनगरीची रया गेल्यासारखी स्थिती आहे.
भररस्त्यात दुकाने थाटण्यात आली आहेत, त्यामुळे रस्त्याने धड चालताही येत नाही. व्यावसायिक गाळेधारकांनी रस्त्यापर्यंत दुकाने आणली आहेत. घरमाल अथवा गाळेधारकांना महिन्याला २० ते ३० हजार रुपये अतिक्रमणाच्या व्यवसायातून मिळतात. ही बाब एव्हाना शहरवासीयांपर्यंत पोचली आहे. प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वर पालिकेची नगण्य रकमेची पावती फाडून व्यावसायिकांचे फावले जात आहे.
त्र्यंबकराजाचा पालखी उत्सव प्रत्येक सोमवारी होतो. त्या वेळी रस्त्यात वाहने उभी करत रस्ता अडवून मजा पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे १७ ते १९ जानेवारी २०२३ ला संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवात लाखांहून अधिक शहरात येणाऱ्या भाविकांना रस्त्याने चालता येईल काय? हा खरा प्रश्न आहे. यात्रेनिमित्ताने होणाऱ्या तयारीचे नुसते कागदीघोडे नाचवले गेल्यास मात्र शहरातील ओंगळवाणे चित्राचे दर्शन घेऊन भाविक, वारकरी आपल्या घरी परततील यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.