A replica of Lord Rama created by Harshada Nitin Khute of Chandwad using rice and turmeric. esakal
नाशिक

Nashik News: तांदूळ, हळदीच्या वापरातून साकारली श्रीरामाची प्रतिकृती! हर्षदा खुटेंचे अनोखे अभिवादन!

श्री रामप्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना विविध माध्यमांतून कलावंत श्रीरामाला अभिवादन करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणूर : श्री रामप्राणप्रतिष्ठा सोहळा होत असताना विविध माध्यमांतून कलावंत श्रीरामाला अभिवादन करत आहे. फुलेनगर चांदवड येथील हर्षदा नितीन खुटे यांनी देखील असेच अनोखं अभिवादन केले.

तांदूळ, हळदीचा वापर करत आकर्षक अशी श्रीरामाची प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती बघण्यासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी खुटे यांच्या घरी भेट दिली. (replica of Shri Ram made using rice and turmeric unique greeting from Harshada Khunte Nashik News)

कामाचा व्याप, घरगाड्याचे नियोजन करताना अनेक गृहिणी आपल्या जन्मजात कलेला सिद्ध करण्यात मुकतात. हर्षदा याला मात्र अपवाद ठरल्या. एक वर्षाच्या लहानग्या मुलाला सांभाळत तीन दिवस मिळेल तसा वेळ काढत हर्षदा यांनी ही कलाकृती साकारली.

यासाठी १ किलो तांदूळ तसेच हळदीचा रंग म्हणून वापर करण्यात आला आहे. यासाठी ६१ बाय ६१ सेमी आकाराची जागा वापरण्यात आली आहे. तांदळाचा एक एक दाणा ठेवताना तसेच श्री रामाचे आकर्षक रूप जपताना कलेचा कस लागला.

गृहिणी संसारगाडा सांभाळत आपली कला जोपासू शकतात त्यांच्यासाठी हर्षदा या आदर्श म्हणून ठरत आहे. त्यांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT